बीड आरटीओ कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण, परराज्यातील वाहनांना परवाने,सीबीआई चौकशीची मागणी:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
                      
                
            
               By : Polticalface Team ,Mon Feb 07 2022 21:25:26 GMT+0530 (India Standard Time)
       
               
                           
              बीड: बीड आरटीओ कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून खाजगी एजंटाच्या माध्यमातुन वसुली केल्याच्या प्रकरणात चौकशी चालु असतानाच परराज्यातील वाहधचालकांना परवाने देण्याचे मोठे रॅकेट कार्यरत असुन नाॅनयुझ सर्टीफिकेट वितरण करताना शासनाचा लाखो रूपयांचा टॅक्स बुडवून शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसुल बुडवल्याबद्दल सीबीआई मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय परीवहनमंत्री नितिन गडकरी, राज्यपरिवहनमंत्री आनिल परब यांना केली असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर,संदिप जाधव, अशोक कातखडे, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, शेख मुबीन, मुक्त पत्रकार तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एम एस युसुफ, डाॅ.संजय तांदळे,माजी सैनिक प्रकाश वाघमारे, शेख आमिर आदि.  सहभागी होते. 
आरटीओ कार्यालयातुन परराज्यातील वाहनचालकांना परवाने, राष्ट्रीय साखळी कार्यरत ;  दहशतवादी कारवाईत वापराची शक्यता सीबीआई मार्फत चौकशीची मागणी 
____
दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी केंद्रशासन व राज्यशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असून मोबाइल, व्हाॅटस अप, फेसबुकच्या माध्यमातुन होणारा दहशतवाद थांबविण्यासाठी देशपातळीवर पोलीस यंत्रणा सक्रीय असताना अशातच बीड 
आरटीओ कार्यालयातुन हरियाणा, गुजरातसह ईतर राज्यातील वाहनचालकांना खाजगी एजंट व कार्यालयातील कर्मचारी, आधिकारी यांच्या संगनमताने एकाच दिवसात परवाने देण्यात आले असुन त्यासाठी प्रति परवाना २५-३० हजार रूपयांचा दर ठरलेला आहे. इतर राज्यातील वाहनचालकांनी बीड मधुन वाहन परवाने का तयार करून घेतले, त्यांचे आधार कार्ड किंवा ईतर कागदपत्रे बीड मधुन कशी तयार करतात सर्वच प्रकार संशयास्पद असुन यामुळे शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसुल बुडवणारे  मोठी राष्ट्रीय साखळी उघडकीस येईल.यासाठी सीबीआई मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून केंद्रीय परिवहनमंत्री नितिन गडकरी, राज्यपरीवहनमंत्री आनिल परब यांना तक्रार करण्यात आली आहे. 
नाॅनयुझ प्रमाणपत्र वितरणात शासनाचा महसुल बुडवून कोट्यावधींचा घोळ; आधिकारी, कर्मचारी मालामाल 
_____
नाॅनयुझ प्रमाणपत्र वाहनांना वितरीत करताना वाहनांचे टॅक्स व परमिट व  ईतर कागदपत्रे तसेच कर न भरून घेता आर्थिक तडजोड करून प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले असून आरटीओ कार्यालयातुन कोरोना लाॅकडाऊन कालावधीत "वर्क फ्राॅम होम "मुळे बहुतांश आधिकारी-कर्मचारी घरूनच कामकाज करत असताना कार्यालयातील मोजकेच कर्मचारी उपस्थित राहील्याने व ग्राहकही कार्यालयात येत नसल्याने त्याचा गैरफायदा घेण्यात आला आहे. 
औरंगाबाद कार्यालया संशयाच्या भोव-यात बोगस कामकाजाचे माहेरघर 
___
लाॅकडाऊन कालावधीत औरंगाबाद येथुन कामकाज सुरू असून बीड आरटीओ कार्यालयातुन हरियाणा, गुजरात, राजस्थान येथील वाहनचालकांना परवाने देण्यात आले असुन बोगस परवाने देण्याचे काम बीड आरटीओ कार्यालयातुन करण्यात आले असून वरिष्ठ आधिकारी लाॅकडाऊन मुळे कार्यालयात येत नसल्याने बीड येथुन एक कर्मचारी सर्व कागदपत्रे घेऊन औरंगाबादला जात असे औरंगाबाद येथुन सह्या करून परवान्याचे वाटप होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. एकंदरीतच बीड आरटीओ कार्यालयातुन परराज्यातील व्यक्तींना वाहन परवाने देण्यात आले असुन त्याचा दहशतवादी कारवायामध्ये वापर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळेच प्रकरण अतिशय गंभीर आहे. 
आरटीओ कार्यालयातील चोरी आणि आगीच्या संशयास्पद प्रकरणांची चौकशी आवश्यक ; परवाने रजिस्टर, नाॅनयुझ प्रमाणपत्र पावतीबुक जाळण्याची शक्यता 
____
बीड आरटीओ कार्यालयातुन हमखास भुरटे चोर चोरी करून संगणक किंवा ईतर कामाच्या वस्तुची चोरी केल्याच्या घटना घडणे नित्याचीच बाब असून काही दिवसापुर्वी आरटीओ कार्यालयातील आगीची घटना संशयास्पद असुन परवाने दिलेले रजिस्टर तसेच नाॅनयुझ प्रमाणपत्र देण्यासाठीचे पावतीबुक आगीच्या भक्ष्यस्थानी सापडु नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे. 
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
मो. नं.८१८०९२७५७२
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष