राशन दुकानदाराच्या नातेवाईका कडून राशनच्या बातम्या का लावतो म्हणत पत्रकार शाम अडागळे याना शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी
By : Polticalface Team ,Mon Feb 07 2022 21:28:58 GMT+0530 (India Standard Time)
तलवाडा/ प्रतिनिधी :- गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे काल दि 5 शनिवारी रोजी साडे बारा ते एक च्या सुमारास पत्रकार शाम अडागळे यांना राशन संदर्भात बातम्या का लावतो म्हणत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सविस्तर असे की सिरसदेवीतील राशन दुकानदारांनी डिसेंबर महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील धान्य राशन दुकानदारांना शासनाकडून मिळूनही लाभार्थ्यांना वाटप न करताच गायब केला होता या संदर्भात पत्रकार अडागळे यांनी वृत्तपत्रात बातम्या लावल्या होत्या म्हणून काल दुपारी सिरसदेवी फाटा येथे अडागळे यांना राशन च्या बातम्या का लावतो म्हणत कचरू तुकाराम वक्ते यांनी दारू पिऊन शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली व तुला काय बातम्या लावायच्या त्या लाव तुला आम्ही बघून घेऊ अशी धमकी दिली आहे .
वक्ते हा राशन दुकांनदाराचा नातेवाईक आहे त्याच्या नातेवाईकाच्या विरोधात राशन संदर्भात अडागळे यांनी बातम्या लावल्या म्हणून हे कृत्य वक्तेनी केले आहे .यावरून सिद्ध झाले आहे की पत्रकार यांनी राशन घोटाळा उघड केल्यामुळे सिरसदेवीतील राशन दुकानदारांचा किती दबाव आहे तसेच सामान्य कार्डधारकाने जर यांच्या विरोधात आवाज उठवला तर त्यांचे काय करतील हेही सिद्ध झाले आहे.
त्यामुळे शाम अडागळे यांच्या जीवितास राशन दुकानदारांकडून धोका आहे उद्या त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊ शकतो यामुळे अडागळे यांनी कचरू वक्ते यांच्या विरोधात कलम 504,506 आणि कलम 4 नुसार पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये दि 6/02/2022 रोजी गुन्हा दाखल केला आहे .पुडील तपास डीवायसपी स्वप्नील राठोड हे करत आहेत.
वाचक क्रमांक :