सदाशिव पाचपुतेंनी बंधुप्रेमाचा आदर्श घातला - रामराव ढोक
By : Polticalface Team ,Wed Feb 09 2022 10:38:15 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा: बंधूवरती प्रेम करताना त्याच्यासाठी ढाल बनून अहोरात्र उभा राहणारे दिवंगत नेते सदाशिव पाचपुते हे एक बंधुप्रेमाची मिसाल होते. त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेम दिले. कुटुंबाला आधार दिला. त्यांच्यासारखा भाऊ हे बबनराव पाचपुते यांच्या राजकारणाची संपत्ती होती. त्यांनी बंधुप्रेमाचा आदर्श घातला असे उदगार काढत ह.भ.प. रामराव ढोक यांनी सदाशिव पाचपुते यांना पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली अर्पित केली.
सदाशिव पाचपुते यांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम काष्टी येथील तुळसाई नगर येथे आयोजित करण्यात आला होता. याला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. कार्यक्रमस्थळी माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, जि.प.चे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, अविनाश महाराज साळुंके यांची भाषणे झाली.
यावेळी बोलताना राहुल जगताप म्हणाले की, कुठे विरोध करायचा आणि कुठे थांबायचे हे सदाशिव पाचपुतेंना ज्ञात होते. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी सर्वांशी संबंध जपले. विरोधकांनाही मान दिला. त्यांच्या जाण्याने तालुक्याचे नेते बबनराव पाचपुते यांची फार मोठी हानी झाली आहे. त्यातून सावरण्याची त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळो.
अनुराधा नागवडे म्हणाल्या की, पाचपुते-नागवडे हा वैचारिक संघर्ष तालुक्यात होता. पण सदाशिव पाचपुते आणि मी एकाच वेळी जिल्हा परिषदेत निवडून गेलो. तालुक्याच्या विकासासाठी बरोबरीने काम करण्याची तयारी त्यांनी कायम दाखवली. विरोधक असूनही त्यांनी आमच्या कुटुंबाला मान दिला. त्यांनी शब्द पाळण्याचा जो आदर्श घालून दिला, त्याची आठवण आम्ही ठेऊ.
या प्रसंगी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी पाचपुते कुटुंबियांच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले. यावेळी बोलताना सदाशिव पाचपुतेंच्या जाण्याने आपला एक हात निकामी झाल्याचे सांगत असताना त्यांना भावना आवरता आल्या नाही. इथून पुढे आपले कुटुंब एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न करू, हीच त्यांना श्रद्धांजली असेल असे बोलायला ते विसरले नाहीत.
चौकट:
साजन पाचपुतेंनी पुढे यावे, कार्यकर्त्यांचा सूर!
सदाशिव पाचपुतेंमुळे पाचपुते गटाची यंत्रणा टिकून होती. कार्यकर्त्यांना पेटून उठवण्यासाठी ते अग्रेसर असत. त्यांच्यामुळे कार्यकर्ते उत्साहात असत. पण आता तीच जबाबदारी पेलवण्यासाठी साजन पाचपुतेंनी पुढे यायला हवे असा सूर पाचपुते समर्थकांनी या कार्यक्रमा दरम्यान चर्चेत आणला. पाचपुते कुटुंबात भविष्यातील चेहरा म्हणून कोणी सक्रिय व्हायचे याविषयी दुफळी आहे. ती बबनराव पाचपुते यांच्या बोलण्यातुन जाणवली. कुटुंबातील वारस एकत्र ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे ते भावनेच्या भरात बोलले. तेच बोल त्यांच्यातील दुफळीचे संकेत होते. पण बबनराव पाचपुते यांना सोडून गेलेले काही प्रमुख चेहरे आज साजन यांच्या नियोजनात पूढे दिसले. त्यातुनच साजन यांच्या संभाव्य वाटचालीची चुणूक दिसून आली.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.