कै.दगडू नामदेव राठोड यांच्या स्मरणार्थ सुरसवाडी येथे वृक्षारोपण
By : Polticalface Team ,Wed Feb 09 2022 23:11:30 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील सुरसवाडी येथील रहिवासी व बोरसेवाडी चे माजी सरपंच लक्ष्मणशेठ राठोड यांच्या वडिलांचे नुकतेच वृद्धापकाळाने १०० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थांसाठी त्यांनी खुले हौदाचे बांधकाम केले व सुरसवाडीतील त्यांचे स्मृतीस्थळी वृक्षारोपण करण्यात आले.
सुरसवाडी येथील एक प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले दगडू राठोड हे स्वभावाने अतिशय शांत, मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांना पशू पालन व निसर्गातील प्राणी, पक्षी यांची खूप आवड होती. त्यांच्या जाण्याने समाजात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना पत्नी, दोन मुले, ५ मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचे थोरले चिरंजीव बबन दगडू राठोड (प्रशासकीय अधि.न.पा. शेवगाव) तर धाकटे चिरंजीव लक्ष्मण दगडू राठोड (माजी सरपंच ग्रा.पं.बोरसेवाडी) हे एक नामवंत चारकोल व्यापारी आहेत.
आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे भव्य असे स्मृतिस्थळ उभारण्यात आले आहे.
सुरसवाडी सारख्या डोंगराळ भागात फेब्रु/मार्च महिन्यापासूनच पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागते. ग्रामस्थांची पाणीविषयक महत्वाची गरज लक्षात घेऊन तसेच प्राणी,पक्षी,वन्यजीव यांना पाणी पिऊन त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, या उदात्त हेतूने या स्मृती स्थळी खुले हौद बांधण्यात आले आहे तसेच याठिकाणी विविध फळांची व शोभेची झाडे लावून हे स्मृतीस्थळ सुशोभित करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे.
या कामी कै. दगडू राठोड यांचे नातू गणेश बबन राठोड ( बीएसटी कंडक्टर),सचिन बबन राठोड (मुंबई पोलीस), किरण लक्ष्मण राठोड (सदस्य ग्रा.पं.बोरसेवाडी)यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचे महान कार्य राठोड परिवाराने केले आहे.
यावेळी संत सेवालाल वनराईचे निर्माते विठ्ठल पवार पवारतांडा, सुरसवाडीतील ग्रामस्थ, महिला, बालगोपाळ आदी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.