पै. भाग्यश्री फंड हीची राष्ट्रकुल (कॉमन-वेल्थ) स्पर्धा 2022 च्या निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड
By : Polticalface Team ,Thu Feb 10 2022 09:32:35 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा:महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाची श्रीगोंदा व इंटरनॅशनल कुस्ती संकुलाची विद्यार्थिनी पैलवान भाग्यश्री हनुमंत फंड हीची जून 2022 मध्ये इंग्लंड देशातील बिरमिंघम येथे होणाऱ्या स्पर्धा 2022 च्या निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. राष्ट्रकुल (कॉमन-वेल्थ) स्पर्धा ही ओलंपिक आणि एशियाड नंतरचा मोठा म्हणजे जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा स्पोर्ट इव्हेंट म्हणून ओळखला जातो. या स्पर्धा कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन घेत असले तरी मुळ संघटना कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स ही आहे. कॉमन वेल्थ ऑफ नेशन चे सदस्य जरी 54 देश असले तरी क्रीडा स्पर्धेत 70 हून अधिक संघ खेळतात.
अशा या जागतिक स्तरावरील कुस्ती स्पर्धेमध्ये इंटरनॅशनल कुस्ती संकुल श्रीगोंदा आणि महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाची सुवर्णकन्या पैलवान भाग्यश्री फंड हिच्या या निवडीबद्दल संबंध महाराष्ट्रातून तिचे कौतुक केले जात आहे व तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत. आज पर्यंत राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर भाग्यश्रीने अनेक पदके मिळवली आहेत त्यामुळे महाराष्ट्राकडून भाग्यश्रीला राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पदक मिळण्याची अपेक्षा आहे.
लखनऊ येथे होणाऱ्या ट्रेनिंग कॅम्पसाठी दिनांक 10/02/2022 रोजी पैलवान भाग्यश्री विमानाने रवाना होत आहे.
भाग्यश्री च्या या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन आमदार बबनराव पाचपुते साहेब, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माननीय बाबासाहेब भोस साहेब, महाविद्यालय विकास समिती सदस्य राहुल दादा जगताप, महावीर पटवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के साहेब सीनियर विभाग उपप्राचार्य प्रा. डॉ. एल आर पाटील जुनियर उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जिमखाना प्रमुख देशमुख सर, क्रीडा शिक्षक प्रा. संजय डफळ, शारीरिक संचालिका प्रा. बहिरम मॅडम, वडील हनुमंत फंड, कोच समाधान सर व प्रकाश कोळेकर यांनी मार्गदर्शन केले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी