उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्याकडून खोडवा सावरगाव येथील शेतकरी कुटुंबातील गणेश गुट्टे यांची एमबीबीएसला निवड झाल्याबद्दल सत्कार
By : Polticalface Team ,Fri Feb 11 2022 13:20:22 GMT+0530 (India Standard Time)
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील शेतकरी कुटुंबातील गणेश बापुराव गुट्टे यांचा नुकताच एमबीबीएसला प्रवेश मिळाल्याबद्दल पंचायत समितीचे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
परळी पंचायत समिती येथे उपसभापती यांच्या दालनात गुरूवार, दि.10 फेब्रुवारी रोजी खोडवा सावरगाव येथील शेतकरी बापुराव गुट्टे यांचा मुलगा गणेश गुट्टे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थिती कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबातील त्यांनी 720 पैकी 565 उच्च गुण प्राप्त करत एमबीबीएसला प्रवेश मिळाला आहे. शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबातील गणेश गुट्टे यांनी एमबीबीएससाठी पात्र झाले आहेत ही अभिमानाची बाब व कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कुरेशी यांनी यावेळी केले आहे. खोडवा सावरगाव येथील शेतकरी बापुराव गुट्टे हे शेतकरी सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीमध्ये असतांना मुलांना शिक्षण देण्यात सदैव आघाडीवर राहिले. सामाजिक भान ठेवून भविष्यामध्ये शिक्षण क्षेत्रामधून मुले उच्च विद्याविभूषित व्हावीत आणि उच्च शिखर गाठावे या स्वप्नपूर्तीसाठी बापुराव गुट्टे यांनी मोठे कष्ट घेतले. मुलगा गणेश याने ही फार मोठे परिश्रम घेऊन एम बी बी एस या वैद्यकीयक्षेत्रातील महत्वपूर्ण शाखेला प्रवेश मिळवून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. निवड झाल्यानंतर पंचायत समिती येथे सत्कार करण्यात आले.
यावेळी उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्यासह पंचायत समिती सदस्य मोहनराव आचार्य, नागपूरचे अनिल सौळंके, बापू दहिफळे, पंचायत समितीचे सामान्य प्रशासन अधिकारी निळकंठ दराडे, जलील कुरेशी परळी वैजनाथ, आरेफभाई, पंचायत समितीचे कर्मचारी बापू कावरे व इतर उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी