छत्रपती कॉलेजचे हिवाळी शिबिर यंदा पेडगावत

By : Polticalface Team ,Fri Feb 11 2022 22:29:31 GMT+0530 (India Standard Time)

छत्रपती कॉलेजचे हिवाळी शिबिर यंदा पेडगावत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदायांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसाचे श्रमसंस्कार शिबिर यंदा पेडगाव येथे होत आहे. स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव व माझी वसुंधरा अंतर्गत शिबिरार्थी गाव व धर्मवीर गडावर श्रमदान करून परिसर स्वच्छ करणार आहेत. श्रमसंस्कार सोबत सात दिवस शिबिरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. शुक्रवारी 11तारखेला नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात या शिबिराच्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना भोस म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेचे धडे गिरवणे गरजेचे आहे. वसुंधरेचे पावित्र्य राखले पाहिजे. यावेळी नागवडे कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक भाऊसाहेब नेटके, प्रा. सुरेश रसाळ, प्रशांत दरेकर, शरद जगताप, राकेश पाचपुते, सुभाष शिंदे,सौ मंदाकिनी पाचपुते, विठ्ठल जंगले, भीमराव लबडे, पेडगावच्या सरपंच सौ सुलोचना भगवान कणसे, उपसरपंच देविदास शिर्के, सेवा संस्थेचे अध्यक्ष रोहिदास पवार, सौ प्रतिभा झिटे, राजकुमार पाटील, हरिदास शिर्के, नारायण खेडकर, भगवानराव कणसे, ज्ञानदेव लाटे, क्षीरसागर गुरुजी, नाना झिटे, ग्राम पंचायतीचे सदस्य, संस्थेचे सचिव, बापूराव नागवडे, कॉलेजचे प्राचार्य डॉ सतीशचंद्र सुर्यवंशी,कार्यक्रम अधिकारी प्रा प्रशांत ढाके, त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक गावातील प्रतिष्ठित मंडळी आदीउपस्थित होते. सुरवातीस भगवानराव कणसे यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्तविक प्राचार्य डॉ सूर्यवंशी यांनी तर सूत्र संचालन प्रा नागवडे सरांनी केले. आभार प्रा नेटके यांनी मानले. सात दिवस चालणाऱ्या या शिबिरास अनेक मान्यवर भेटी देऊन मार्गदर्शन करणार आहेत. स्रोत : ईश्वर कणसे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी