पोलिसांना दमदाटी तरी एका दिवसात हे साहेब घरी.

By : Polticalface Team ,Sun Feb 13 2022 09:41:14 GMT+0530 (India Standard Time)

पोलिसांना दमदाटी तरी एका दिवसात हे साहेब घरी. दौंड येथील आंबेडकर चौकात बंदोबस्तासाठी उभे असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना दमदाटी व आरेरावी केल्याचा ठपका ठेवत अवधुत राऊत यांच्यावर दौंड पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. ३५३, ३३२, ५०२, ५०४ असले गंभीर कलम गुन्हा दाखल करताना टाकण्यात आले. पोलिसांनी नगर-पुणे जिल्ह्यातील अनेक बड्या हस्तींनी फोनाफोनी करत हा गुन्हा दाखल होण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न केला. पण गुन्हा त्या आधीच तडकाफडकी दाखल झाल्याने अवधुत राऊत यांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्याशिवाय पोलिसांकडे पर्याय नव्हता. पण ताब्यात घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी दौंड न्यायालयाने अवधुत राऊत यांची जामिनावर सुटका केली. पोलीस फिर्यादी असताना हा गुन्हा त्यांच्या विरोधात असताना याला गंभीर स्वरूप प्राप्त झाले होते. त्यात ३५३ च्या गुन्ह्यात तालुक्यातील बडेबडे नेते १०-१५ दिवस आत राहिले आहेत. राऊत यांच्या बद्दल हीच शक्यता होती. पण राऊत यांनी एका दिवसात बाहेर येत आपला करिष्मा दाखवला. राऊत यांना अटक झाल्यानंतर काहीं लोकांनी या बातमीला रंग देऊन पसरवण्याचे काम केले त्यांना ही जोराची चपराक बसली असल्याचे जाणवत होते. अवधुत राऊत यांचा राजकीय व्यवस्थापनात असलेला हातखंडा अनेकांना जळवणारा आहे त्यामुळे त्यांना तसे विरोधकही लाभले असल्याचे दिसून येते. पण आपल्या विरोधकांच्या षड्यंत्रांना ते कायम पुरून उरत आले आहेत. आ. बबनराव पाचपुते वगळता तालुक्यातील सर्वच नेते अवधुत राऊत यांच्यामागे उभे असल्याचे दिसते. त्यात मुंबई तील कायदेतज्ज्ञ निवेदिता पोतदार या साऱ्या प्रकरणात लक्ष ठेऊन असल्याची ही चर्चा होती. गुन्हा दाखल झाल्यावर मंगळवारी रात्री उशिरा अनेकांनी राऊत यांच्यासाठी दौंड पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. बंडूतात्या जगताप, अंकुश शिंदे, विशाल सकट,योगेश चंदन यांनी सर्व सूत्रे हलवल्याचे बोलले जाते. राऊत यांचे वकील ऍड.राजेंद्र बोडखे यांनी केलेला युक्तिवाद गाजला. संभाजी ब्रिगेडचे नगर जिल्हाध्यक्ष टिळक भोस, डॉ.संतोष हिरडे, सतीश कूतवळ, डॉ.बाळासाहेब पवार, प्रहार संघटनेचे सुरेश सुपेकर, उद्योजक संजय काळे, माऊली पाचपुते, युवराज उबाळे शशिकांत जाधव, प्रताप भोर, निकेतन सकट, प्रताप जाधव, संभाजी जाधव, सचिन पाडळे, पपू शेख, प्रसाद भिवसने, मयूर शिंदे, अरुष महाजन यांच्यासह अनेकांनी पोलिस स्टेशन गाठले होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष