श्रीगोंद्यातील युवकाची युपीएससी , एन डी ए परीक्षेत पास होऊन पायलट पदावर नियुक्ती
By : Polticalface Team ,Mon Feb 14 2022 12:56:22 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनीधी / श्रीगोंदे = श्रीगोंदे शहरातील मखरेवाडी येथील 19 वर्षीय अभिषेक संजय वाळके हा तरुण युपीएससी एन डी ए परीक्षेत पास होऊन पायलट पदावर नियुक्ती झाली असल्याने वाळके यांचे श्रीगोदे तालु्यातील सामाजिक , राजकीय क्षेत्रातून अभिंनदन होत आहे .
श्रीगोंदे शहरातील मखरेवाडी येथील संजय वाळके हे वाराणशी येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये कार्यरत आहेत. त्यांचे चे चिरंजीव अभिषेक याने दि 18 एप्रिल 2021 मध्ये केन्द्र शासनाच्या युपीएससी एन डी ए ची परीक्षा प्रयागराज उत्तर प्रदेश येथे दिली होती .या परीक्षेसाठी भारतातून सुमारे साडे सात लाख विद्यार्थी बसले होते ,त्या पैकी 8 हजार विद्या्थी पास झाले होते .आणि इंटरव्ह्यू मध्ये देशातून 517 मुले पात्र झाली होती , विषेता या मधून पायलट पदासाठी फक्त 83 मुलांची निवड झाली होती त्यामध्ये अभिषेक याची निवड झाली आहे . अभिषेक याची निवड झाल्याबद्दल आमदार बबनराव पाचपुते , माजी आमदार राहुल जगताप , नागवडे कारखान्यांचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे , चैतन्य ट्रकर शोरुम चे मालक काका गोरखे , यांनी अभिंदन केले
वाचक क्रमांक :