वांगदरी येथील शेतकऱ्याची चालू ऊसतोडणी राजकीय हेतूने बंद केल्याने तहसिल कार्यालय येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण
By : Polticalface Team ,Tue Feb 15 2022 11:18:00 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा :
सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याकडून वांगदरी येथील शेतकरी अनंता भुजंगराव पवार यांच्या शेतातील सुरू असलेली ऊसाची तोडणी राजकिय सुडबुध्दीने नागवडे कारखान्याच्या शेतकी विभागाने अचानक बंद करण्यात आल्याचा आरोप करत चालू प्लॉटची दोन दिवसात तोडणी करण्यासाठी कार्यवाही करण्यासाठी आदेश व्हावा तसेच चालू प्लॉट बंद केल्याच्या निषेधार्थ सोमवार दि २८ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालय श्रीगोंदा समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा पवार यांनी श्रीगोंदा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला.
या बाबत पवार यांनी निवेदनात सांगितले की वांगदरी ता.श्रीगोंदा येथील गट नं . ६४ , ५ ९ , ९ २ मध्ये अनंता भुजंगराव पवार यांची ऊसाची शेती असून चालू हंगामामध्ये जमिनीतील ऊसाची तोडणी करण्यासाठी सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याकडून ऊसतोड कामगार पाठविण्यात आले असताना कारखान्यातील शेतकी विभागाने राजकिय सुडबुध्दीने तोडणी अचानक बंद केली. ऊस तोड चालू करण्याकरिता शेतकी अधिकारी व कार्यकारी संचालक यांना वेळोवेळी विनंती करून देखील त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे सांगत ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्याचा आरोप केला. ऊस तोडणी बाबत गांभिर्याने व तात्काळ दखल घेण्यात येऊन ऊसाची तोड दोन दिवसात सुरू करण्यासाठी आदेश व्हावा तसेच चालू प्लॉट बंद केल्याच्या निषेधार्थ सोमवार दि २८ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालय श्रीगोंदा समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा पवार यांनी श्रीगोंदा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला. सदर निवेदनाच्या प्रती साखर आयुक्त साहेब , महाराष्ट्र राज्य यांना माहितीसाठी प्रादेशिक सहसंचालक ( साखर ) अहमदनगर, कार्यकारी संचालक सो . स.म.शि.ना.ना.सह. कारखाना लि . , श्रीगोंदा फॅक्टरी, पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्या आहेत.
वाचक क्रमांक :