डॉ.संतोष मुंडे व सुंदर गित्ते यांच्या माध्यमातून नंदागौळात मोफत तपासणी व श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न

By : Polticalface Team ,Tue Feb 15 2022 17:55:35 GMT+0530 (India Standard Time)

डॉ.संतोष मुंडे व सुंदर गित्ते यांच्या माध्यमातून नंदागौळात मोफत तपासणी व  श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न परळी(प्रतिनिधी):परळी तालुक्यातील नंदागौळ येथे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील 327 नागरिकांच्या कानाची कॉम्प्युटराईजड मशिनने मोफत तपासणी व 12 श्रवणयंत्राचे वाटप रविवारी 13 फेब्रुवारी रोजी करण्यात आले,यावेळी बोलताना डॉ.संतोष मुंडे यांनी आरोग्य सेवा हीच खरी जनसेवा असल्याचे प्रतिपादन केले. याबाबत सविस्तर वृत्त की,सामाजिक कार्यकर्ते व एनसीपी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते या दोघांच्या माध्यमातून नंदागौळ येथे 2012 पासून अनेक आरोग्य तपासणी विषयक शिबिरे,मोफत तपासणी तसेच अनेक श्रवणयंत्रांचे यापूर्वी वाटप केलेले आहे,परंतु सध्या अनेक नागरिकांची मागणी येत असल्याने गावातील नागरिकाना गावातच तपासणी व जाग्यावर श्रवणयंत्रांचे वापट करण्याच्या उद्देशाने कर्णबधिर असलेल्या नागरिकांच्या कानाची प्रत्येकी 500 रुपयांची कॉम्प्युटराईजड मशिनने मोफत तपासणी करण्यात करण्यात आली,तसेच 12 नागरिकांना श्रवणयंत्र देण्यात आले,यावेळी गावातील नागरिकांना सकाळी 8 वाजल्यापासून मोठी गर्दी केली होती,यावेळी बोलताना डॉ.संतोष मुंडे यांनी आरोग्याचे महत्व पटवून देत आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा व जनसेवा असल्याचे प्रतिपादन केले आणि मागील 10 वर्षापासून नंदागौळकरासाठी अनेक आरोग्य शिबिरे घेऊन जनसेवा सुरू असून येत्या काळात सुद्धा जनसेवेत कमी पडणार नसल्याचे सांगितले.यावेळी सिद्धेश्वर मुंडे,माजी सरपंच बाबुराव गित्ते,माजी सरपंच शंकरराव जगताप,माजी चेअरमन नारायण गित्ते,ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ जगताप,बाळू जगताप,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य दिनकर गित्ते सह अनेक नागरिक,महिला-पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी