रस्त्याचा ठेकेदार कामगारांचे पैसे देण्यास करतोय टाळाटाळ
By : Polticalface Team ,Wed Feb 16 2022 18:23:39 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा:- प्रतिनिधी,
आपल्या कष्टाने,कामाने समाजातील इतर लोकांचे जीवन सुखमय बनविणाऱ्या कामगारांना आपल्या हक्काची रक्कम वेळेवर मिळणे हे अत्यंत महत्वाचे आहे. हलाकीच्या परिस्थिती मुळे फक्त कुटूंबावरती लक्षकेंद्रित करत येणाऱ्या पगाराची आतुरतेने वाट पाहत असतात, मिळेल ते काम अगदी आनंदात करताना दिसतात परंतु ह्या कामगारांचे मेहनतीच्या कष्टावर आपली पोळी भाजून घेणाऱ्या ठेकेदाराला ह्या कामगारांचे कष्ठाचे पैसे देताना अडचण यावी की मुद्दामपणा! हे घृणास्पद गोष्ट आहे, विनाकारण मुद्दामहुन कामगारांचे पैसे न देणे म्हणजे पाणी कुठेतरी मुरतय अशी शंका निर्माण होते?
सविस्तर माहिती अशी कि,श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील मांडवगण रोडचे डांबरीकरण रस्त्याचे काम ठेकेदार साहेबराव पांडूळे यांनी केले होते, त्या कामावर ३५ ते ४० जन कामगार म्हणून काम करत होते. काम पूर्ण झाल्यावर तात्काळ सर्व कामगारांचे पैसे देण्याचे सदर ठेकेदाराने कामापूर्वीच मान्य व कबूल केले होते, त्याप्रमाणे सर्व कामगारांनी वेळेत काम पूर्ण केलेले आहे. सदरचे काम पूर्ण झालेले आहे. परंतु काम पूर्ण होऊन १५ दिवस उलटले तरी सदर ठेकेदाराने आमच्या कामाचे पैसे दिलेले नसून त्यास पैसे मागितले असता उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे आमची मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचण निर्माण होऊन कुटुंबाची गुजरण करणे अवघड झालेले असून आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. रस्त्याच्या कामावरच आमची व आमच्या कुटुंबाची उपजीविका भागवली जाते परंतु वेळेत पैसे न मिळाल्यामुळे आमची मोठी तारांबळ उडाली आहे.
याबाबत या सर्व कामगारांनी श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे, नायब तहसीलदार ढोले मॅडम, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,माजी आमदार राहुल जगताप यांना याबाबत निवेदन देमाहिती दिली आहे.
चौकट:-
याबाबत प्रतिनिधी यांनी पांडुळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे माहिती विचारली असता मी कोणत्याही कामगाराचे पैसे बुडणार नाही. ठेकेदार पांडुळे यांनी श्रीगोंदा ते पारगाव या रस्त्याचे काम चालू केले आहे.व त्या रस्त्याचे काम करण्यास नकार दिल्यामुळे मी त्याच्या कामाचे पैसे थकवले आहे असे सांगण्यात आले.
जर या गरीब लोकांचे संबंधित ठेकेदार यांनी जर लवर त्यांच्या घामाचे पैसे लवकर दिले नाहीत तर ठेकेदाराला श्रीगोंदा तालुक्यात फिरून देणार नाही.- सामाजिक कार्यकर्ते-नितीन रोही
आमचे या ठेकेदाराने लवकर पैसे दिले नाहीत तर आमचे सर्वांचे कुटुंब उदवस्त होईल त्यामुळे आम्हाला जीव द्यावा लागेल.-उकांडा राठोड(मुकादम/कामगार)
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी