त्यांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तरे देणार. - राजेंद्रदादा नागवडे

By : Polticalface Team ,Wed Feb 16 2022 22:06:36 GMT+0530 (India Standard Time)

त्यांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तरे देणार.
           -  राजेंद्रदादा नागवडे श्रीगोंदा: कारखाना निवडणुकी नंतर आम्ही कोणावरही टीका टिपणी केली नाही. मात्र विरोधक कारखाना दुर्घटनेत ही राजकारण करतात.आमच्या विषयी वाटेल ते बोलतात. बेसुमार आरोप करणे त्यांनी थांबवावे. त्यांच्या टीकेला आम्ही आता कामातून उत्तरे देणार. असा इशारा राजेंद्रदादा नागवडे यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधकाना दिला. नागवडे कारखानाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा यथोचित सत्कार समारंभ पेडगाव ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला. या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलतांना नागवडें म्हणाले की, कारखान्यात दुर्घटना होऊन टाकी फुटली.आम्ही त्यावर उपाय योजना करण्यात व्यस्त आहोत. विरोधक मात्र त्यातही राजकारण करण्यात दंग आहेत. कारखाना बंदची भाषा बोलत आहेत. आता निवडणूक संपली आह. कारखान्याचा कारभार सुरळीत चालू ठेवण्यासाठी सहकार्य करण्याऐवजी अफवा पसरवत आहेत. सभासदनी त्यावर विश्वास ठेव नये. पेडगावकराच्या सत्कराने भारावून राजेंद्रदादा म्हणाले, माझ्या राजकिय जीवनाची सुरुवात याच ऐतिहासिक पेडगावतुन झाली. पेडगावचा माणूस जेवढा स्वाभिमानी तेवढाच शब्दालाही जगणारा आहे. पेडगावकरांनी नागवडें कुटुंबावर भरभरून प्रेम केले. आम्ही त्यांची सदैव जाण ठेव. ज्यांनी उसाच्या नोंद कारखान्याकडे केल्या नाहीत त्यांनी नोंद कराव्यात. सर्व ऊस उत्पादकना न्याय देण्याचं काम आम्ही करू. या वेळी नूतन पदाधिकारी व संचालकांचा सरपंच ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत स्वयं सहाय्यता निधीतून गावातील दिव्यांगाना भेट वस्तु वाटण्याचा कार्यक्रम पार पडला. यानंतर एक विशेष सत्कार पार पडला. पेडगावचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा संवर्धन करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे निवृत्त ग्रंथपाल डॉ नारायणराव गवळी यांनी जे योगदान दिले त्याबद्दल ऋण व्यक्त करण्याच्या उद्देशाने पेडगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना सन्मान पत्र व स्मृती चिन्ह राजेंद्र दादा नागवडें यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. सुरवातीला प्रस्ताविक करताना सरपंच पती श्री भगवानराव कणसे म्हणाले की, निवडणूकितील यशामुळे राजेंद्रदादा नागवडेंची खरी ताकद तालुक्याला कळली आहे. विरोधकही त्यामुळे धास्तावले आहेत. म्हणूनच कालपर्यंत आगामी निवडणूका स्वबळावर लढू म्हणारी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करण्याची भाषा बोलू लागले आहेत. मात्र गरजेपुरते आम्हाला जवळ करून विधानसभेला स्वतःच घोडं दांमटायचे आता हे चालणार नाही. विधानसभेला नागवडें कुटुंबातील उमेदवार असणार. यात तडजोड होणार नाही. बाबासाहेब भोस यांनी बोलताना ग्वाही दिली की तालुक्यातील एक टिपरू ही गाळपा विना राहणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. यावेळी रंगनाथ बिबे, बाशु काझी यांनी ही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास नागवडे कारखाना संचालक सुभाष काका शिंदे, श्रीनिवास घाडगे, शरद जगताप, राकेश पाचपुते, प्रशांत दरेकर, प्रा। सुरेश रसाळ, मारुती पाचपुते, बंडूतात्या जगताप, भाऊसाहेब नेटके पेडगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुलोचना कणसे, त्यांचे सर्व सहकारी सदस्य, छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ सूर्यवंशी त्यांचे सहकारी प्राध्यापक, ऐन एस एस विद्यार्थी, गावातील नारायण भाऊ खेडकर, ज्ञानदेव लाटे, क्षीरसागर गुरुजी, गणपत शिर्के, बाळासाहेब नवले व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचालन संचालक, भाऊसाहेब नेटके यांनी केले तर आभार गोरख खेडकर यांनी मानले.
स्रोत: ईश्वर कणसे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष