केवळ रेमडीसिवीर इंजेक्शन गैरव्यवहार नव्हे तर कोरोना कालावधीतील आरोग्य विभागातील बीड जिल्हारूग्णालयातील संपुर्ण गैरव्यवहाराची झाडाझडती;उद्या चौकशी समिती बीड मध्ये दाखल
By : Polticalface Team ,Thu Feb 17 2022 10:57:17 GMT+0530 (India Standard Time)
बीड: जिल्हा रूग्णालयातील संपुर्ण कोरोना कालावधीत जिल्हा नियोजन समितीतुन तसेच आपत्तीव्यवस्थान समितीतुन आरोग्य विभागाला दिलेल्या संपुर्ण खरेदीचे ऑडीट करण्यात यावे त्याच बरोबर रेमडीसिवीर इंजेक्शन गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासह डाॅ.अशोक थोरात, डाॅ.सुर्यकांत गिते आणि विद्यमान डाॅ.सुरेश साबळे यांच्या कालावधीत झालेल्या विविध गैरव्यवहार प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व त्यांचे सहकारी भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर , उपाध्यक्ष मराठवाडा ऑल इंडीया पॅथर नितिन सोनावणे ,सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, शेख मुबीन, अशोक कातखडे आदिंनी वारंवार आंदोलन केल्यानंतर अखेर दि.१७ फेब्रुवारी गुरूवार रोजी उपसंचालक आरोग्य सेवा लातूर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती बीड जिल्हारूग्णालयात दाखल होणार असुन संपुर्ण तक्रारी संदर्भात तक्रारदारांची सुनावणी घेणार आहे.
प्रजासत्ताक दिनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना प्रत्यक्ष निवेदन
___
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलनानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंढे यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन कैफ़ियत मांडल्यानंतर त्यांनी निवेदनावर टीपन्नी करत तात्काळ चौकशीचे आदेश देऊन संबधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
केवळ रेमडीसिवीर इंजेक्शन गैरव्यवहारच नाहीतर संपुर्ण तक्रारीची चौकशी, वेळ सकाळी ११ ऐवजी दुपारी २ वाजता
______________
ऊद्या दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सहसंचालक आरोग्य अभियान मुंबई महेश बोटले यांच्या आदेशाची अवमानना व रेमडीसिवीर इंजेक्शन गैरव्यवहार प्रकरणातील दिपक इंदर थोरात यांना पाठींबा संदर्भात लेखी पत्रात चौकशीची वेळ सकाळी ११ ची नमुद केली असताना, आज सायंकाळी मुख्य क्लार्क उपसंचालक आरोग्य परिमंडल कार्यालय लातूर अंभोरे यांनी फोनवरून केवळ रेमडीसिवीर इंजेक्शन गैरव्यवहार नव्हे तर आजपर्यंतच्या तुमच्या सर्वच तक्रारींची तफशीलवार लेखक जवाब द्या त्याची चौकशी करण्यात येईल तसेच ऊद्या काही अपरिहार्य कारणास्तव सकाळी ११ ऐवजी दुपारी २ वाजता सुनावणी होणार असल्याचे फोनवरून कळवले
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.८१८०९२७५७२
बीड जिल्ह्य़ातील कोरोना कालावधीत आरोग्य विभागातील विविध खरेदीत कोट्यावधी रूपयांचा गैरव्यवहार आरोग्य विभागातील वरिष्ठ आधिकारी, राजकीय नेते, जिल्हाधिकारी बीड यांच्या संगनमतानेच झाला असून संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी, खर्चाचे ऑडीट करण्यात यावे तसेच गैरव्यवहार प्रकरणातील संबधित आधिका-यांना बडतर्फ करण्यात येऊन सीबीआई मार्फत व त्यांची व त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्या
कोरोना कालावधीत आरोग्य विभागातील विविध खरेदीचे उच्च स्वतंत्र कमिटीमार्फत ऑडीट करण्यात येऊन गैरव्यवहार प्रकरणात सीबीआई
चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
२) डाॅ.सुर्यकांत गिते तत्कालीन जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड तसेच अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.सुखदेव राठोड ,रक्तपेढी प्रमुख डाॅ.जयश्री बांगर,गणेश बांगर, बडतर्फ भंडारप्रमुख राजरतन जायभाये, आदिनाथ मुंढे, तानाजी ठाकर, शेख रियाज, शेख एजाज अली यांच्यावर रेमडीसिवीर इंजेक्शन गैरव्यवहार प्रकरणात सुत्रधार असल्याचा संशय असून त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात येऊन उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी.
३)डाॅ.सुरेश साबळे जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड यांच्यावर बडतर्फ कर्मचारी राजरतन जायभाये यांना ५०० जम्बो सिलेंडर व ईतर औषध खरेदी गैरव्यवहार प्रकरणात चौकशी असुन त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावेत से उपसंचालक आरोग्य परिमंडल लातूर डाॅ.एकनाथ माले यांनी आदेश देऊन सुद्धा बीड नगरपालिकेमार्फत कोरोनाबाधित मयतांवर अंत्यविधी निधीतील गैरव्यवहार प्रकरणात चौकशी न केल्याबद्दल व भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
४) डाॅ.अशोक थोरात जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय नाशिक यांच्यावर बीड जिल्ह्य़ातील अंबाजोगाई सेशन कोर्टात अवैध गर्भपातातील गुन्हेगार म्हणून खटला चालु असून त्यांच्यावर विभागीय चौकशीत डाॅ.एकनाथ माले उपसंचालक आरोग्य परिमंडल लातूर यांनी डाॅ.अशोक थोरात यांची विभागाबाहेर बदली करण्यात यावी असे अहवालात नमुद करताना अंबाजोगाई सेशन कोर्टात सुरू असलेल्या खटल्यातील साक्षीदार बीड जिल्ह्य़ातील असुन डाॅ.अशोक थोरात यांची उपसंचालक आरोग्य परिमंडल लातूर पदी नियुक्ति झाल्यास दबाव येऊन खटल्यात पारदर्शकता येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांची पदोन्नती करण्यात येऊ नये अन्यथा आम्हाला औरंगाबाद खंडपीठात जनहीत याचिका दाखल करावी लागेल याची गंभीर नोंद घ्यावी.
५) सध्या बीड जिल्हा आरोग्य आधिकारी जिल्हापरिषद बीड नियुक्त झालेले डाॅ.अमोल गिते यांच्या कोरोना कालावधीत औरंगाबाद जिल्हापरीषदेचे जिल्हा आरोग्य आधिकारी म्हणून कार्यरत असताना लाॅकडाऊन कालावधीत डाॅ.अमोल गिते खाजगी वाहनाने जालन्याकडे जात असताना पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनात ६ लाख ७ हजार रूपये व विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या होत्या यावरून त्यांच्यावर आपत्तीव्यवस्थान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती तसेच संबधित प्रकरणात त्यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका न्यायमुर्तिनी फेटाळुन लावली होती.
त्यामुळेच त्यांची बीड जिल्हा आरोग्य आधिकारी जिल्हापरिषद बीड म्हणून नियुक्ती रद्द करण्यात यावी.
६)बीड जिल्ह्य़ातील जिल्हा हिवताप कार्यालयातुन बोगस प्रमाणपत्र वितरीत प्रकरणात संबधित दोषींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी.
७)बीड जिल्ह्य़ातील प्रेरणा प्रकल्प अंतर्गत
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष