नाशिक शहरातील शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट

By : Polticalface Team ,Thu Feb 17 2022 20:45:16 GMT+0530 (India Standard Time)

नाशिक शहरातील शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट

नाशिक,दि.१७ फेब्रुवारी :- प्रभाव कमी झाला असला तरी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊन पुन्हा कोरोना वाढणार नाही यासाठी शासनाने दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शहरातील शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना केले. नाशिक शहरातील विविध विभागातील शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पालकमंत्री छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म येतील कार्यालयात भेट घेतली. यावेळी आयोजित बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवजन्मोत्सव समितीचे मामा राजवाडे, अंबादास खैरे, संदीप लभडे, नितीन रोठेपाटील, राम पाटील, संजय राऊत, योगेश निसाळ, विक्रम कोठुळे, जीवन रायते, बाळासाहेब गीते, राहुल कमानकर, गणेश मोरे, दिनेश चव्हाण, गणेश तांबे, किशोर जाचक, अमित खांडे, उमेश चव्हाण, सागर पाटील, पंकज पाटील, सुयश पाटील, किशोर जाचक, राजेश गोडसे, चेतन शेलार, संजय जाधव, बाळ निगळ, बाळासाहेब जाधव, किशोर निकम, बाळासाहेब पोरजे, धनंजय रहाणे, शिल्पाताई सोनार, तुषार गवळी, चेतन शेलार, डॉ. जयंत थविल, राजेश पवार, समाधान जेजुरकर, अमर वझरे यांच्यासह शहरातील विविध ठिकाणच्या शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शिवजन्मोत्सव हा सर्वांचा उत्सव असून हा उत्सव साजरा करतांना समाजात आनंद कसा वाढेल यावर भर देण्यात यावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यात यावे. शिवजयंती उत्सव साजरा करतांना कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. प्रशासन व यंत्रणेला सर्वांना सहकार्य करण्यात यावे. अतिउत्साहाच्या भरात उत्सवाला कुठलही गालबोट लागत कामा नये. हा सर्व उत्सव शांततेच्या मार्गाने पार पडेल यासाठी सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करत सर्वांना शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी शिवजन्मोत्सव समित्यांच्या असलेल्या विविध अडचणी समजून घेत अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याचे निरासन केले. यावेळी शहरातील विविध शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांचा सत्कार करून त्यांना शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शहरात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमाबाबत माहिती दिली.

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न