निर्भय कन्या अभियान अंतर्गत श्री आनंद महाविद्यालयात विशेष व्याख्यान शिबिर
By : Polticalface Team ,Fri Feb 18 2022 20:30:53 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी येथे विद्यार्थी विकास मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान अंतर्गत विशेष व्याख्यान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात अरिहंत हॉस्पिटल, पाथर्डीच्या डॉ. सपना गांधी यांनी स्त्रियांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. स्त्रीचे शारीरिक स्वास्थ्य जर व्यवस्थित राहायचे असेल तर तिने आहार, विहार, निद्रा याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. दैनंदिन दिनचर्या, ओमकार , सूर्यनमस्कार, व्यायाम, प्राणायाम इत्यादी गोष्टींकडे लक्ष दिले, तरच तिचे शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहू शकते. त्याचबरोबर आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. स्त्रियांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले तर मनावर, शरीरावर परिणाम होतो. त्यासाठी प्राणायाम, मेडिटेशन, ओमकार मंत्र, विचारा मधील सकारात्मकता खूप परिणामकारक ठरू शकते. स्त्रियांच्या अंगी अनेक भूमिका पार पाडण्याची किमया असते, त्यासाठी प्रत्येकीने शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपण्याची आत्यंतिक गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
या अभियानाअंतर्गत दुसरे व्याख्यान डॉ. पांडुरंग काकडे यांनी महिला व्यक्तिमत्व विकास आणि सशक्तीकरण या विषयावर दिले. व्यक्तिमत्व विकास का महत्वाचा आहे, याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. महिला या जगातील प्रतिभांचा मोठा साठा आहे, म्हणून प्रगतशील देशासाठी त्या खूप योगदान देऊ शकतात. तसेच त्यांचा व्यक्तिमत्व विकास व सक्षमीकरण झाले पाहिजे, त्यासाठी त्यांना अधिकार जबाबदारी आणि आदर दिला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
या अभियानाअंतर्गत प्राध्यापिका मनिषा सानप यांचे समान संधी या विषयावर तिसरे व्याख्यान झाले. भारतीय राज्यघटनेने स्त्रियांना भारतीय राज्यघटनेने समान संधी उपलब्ध करून दिलेली आहे, कुठलेही क्षेत्र असो, आज स्त्री यशाचे अनेक दालने पार पाडत आहे, पार करत आहे, असे त्यांनी आपल्या व्याख्यानात नमूद केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी कल्याण मंडळ श्री आनंद कॉलेज पाथर्डी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार होते. आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना आत्मनिर्भर होण्यासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा. डॉ. बर्शीले यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉ. जयश्री खेडकर यांनी केले. शेवटी आभार प्राध्यापिका अनिता पावसे यांनी मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. अजिंक्य भोर्डे,अरुण बोरुडे , डॉ. भावसार, प्राध्यापिका रूपाली शिंदे, तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी