नागरिकांचे आरोग्य जपत साधणार विकास - पालकमंत्री छगन भुजबळ

By : Polticalface Team ,Fri Feb 18 2022 20:35:42 GMT+0530 (India Standard Time)

नागरिकांचे आरोग्य जपत साधणार विकास - पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक, निफाड, येवला, दि.१८ फेब्रुवारी : कोरोनाचा प्रार्दूभाव कमी झाला असला, तरीही धोका अजून टळलेला नाही. प्रत्येकाने स्वत:चे व कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. विकास हा जनतेसाठी असून, नागरिकांचे आरोग्य जपत विकास साधणार, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. निफाड येथील गाजरवाडी येथे आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जयदत्त होळकर, निफाडचे तहसिलदार शरद घोपरडे, गटविकास अधिकारी संदिप कराड, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता अर्जून गोसावी, शाखा अभियंता गणेश चौधरी, गाजरवाडीचे सरपंच प्रकाश दराडे, शिरवाडेचे सरपंच डॉ. श्रीकांत आवारे, भाऊसाहेब भवर, बाळासाहेब पुंड, बबन शिंदे, भाऊसाहेब बोचरे, दत्तात्रय डुकरे, बबन नाना शिंदे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, कोरोना काळात विकासकामांवर मर्यादा होती. परंतु आता अर्थचक्र गतिमान होत असून, परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विकासकामांसाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून जलदगतीने थांबलेली विकासकामे निश्चितच पूर्ण केली जात आहेत. कोरोना काळात आरोग्यविषयक सेवांना प्राधान्य देण्यात आले आहे. आज ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण झाला असून 450 मेट्रीक टन ऑक्सीजन उपलब्ध आहे. आगामी लाटेच्या अनुषंगाने 750 मेट्रीक टन ऑक्सिजनची उपलब्धता सुध्दा त्वरीत होऊ शकेल यासाठी जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये ऑक्सीजन निर्मिती युनिट तयार केले गेले आहेत, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले. निफाड तालुक्यातील गाजरवाडी येथील या कामांचे झाले भुमीपूजन व लोकर्पण निफाड तालुक्यातील गाजरवाडी येथील प्रमुख जिल्हा मार्ग ६९ गाजरवाडी धारणगाव रस्ता प्रजिमा.किमी १८/३०० ते २२/२०० ची सुधारणा करणे ता. निफाड जि नाशिक कामाचे भुमीपूजन (रु.३५० लक्ष), निफाड पंचायत समिती मधील निधीतुन आदिवासी बस्तीत पाण्याची टाकीचे लोकार्पण (रु.7 लक्ष), "क" वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत बुवाजी बाबा मंदिर संरक्षण भिंत लोकार्पण करणे (रा.८ लक्ष), १५ वा वित्त आयोग अंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण (रु.४.३७ लक्ष), जनसुविधा विशेष योजनेअंतर्गत स्मशानभूमी अनुषंगिक कामे (निवारा घोड बांधकाम ) (रु.१० लक्ष) आदी कामांचे भूमीपूजन व लोकार्पण आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.