श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंदा ते जरेवाडी (ता पाटोदा) ही 107 किमीची प्रेरणा सायकल वारी काढून ऊस तोडणी कुंटुबांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची भेट
By : Polticalface Team ,Sat Feb 19 2022 10:16:13 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंदा ते जरेवाडी (ता पाटोदा) ही 107 किमीची प्रेरणा सायकल वारी काढून बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील ऊस तोडणी करणाऱ्या कुंटुबांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची भेट आणि शिक्षकांचा सन्मान केला.
जरेवाडीत सायकल वारीचे आगमन होताच ढोल ताशांचा गजर आणि शाळकरी मुलांनी सायकल पटूवर फुलांची उधळण करुन स्वागत करुन मने जिंकली.
सकाळी सहा वाजता श्रीगोंदा येथे कन्या विद्यालयातील मुलींच्या हस्ते सायकल वारीस हिरवा झेंडा दाखविण्यात आला यावेळी उपप्राचार्या गिता चौधरी दिलीपराव काटे किसन वऱ्हाडे घोडेकर सर उपस्थित होते
यावेळी बोलताना श्रीगोंद्याचे गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे म्हणाले कि, जरेवाडी शाळेतील शिक्षकांनी कठोर परिश्रम घेत शैक्षणिक दर्जा उंचावला 150 लोकसंख्या असलेल्या या वाडीतील शाळेत 800 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ही भुषवाह बाब आहे.
राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श शिक्षक संदीप पवार म्हणाले की, अग्नीपंख फौंडेशनने यापुर्वी डॉ ए पी जे अब्दुल कलाम बेस्ट स्कुल चा राज्य स्तरीय पुरस्कार देऊन सन्मान केला आणि आता आता श्रीगोंदेकरांनी सायकल वारी काढून आमचे प्रोत्साहन वाढविण्याचे काम केले आहे
यावेळी उद्योजक विठोबा निंबाळकर दक्ष फौंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप मुख्याध्यापक गोविंद कदम विशाल चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन कैलास पवार यांनी केले.
सायकल वारीचे भावडी येथे श्रीकांत भोस मिरजगाव येथे अशोक खेतमाळीस तसेच कडा अमोलक जैन शाळेतील शिक्षकांनी सायकल वारीचे स्वागत करुन चहापाणी नाष्टा भोजनाची व्यवस्था केली.
चौकट
सायकल वारीत सहभागी झालेले सायकल पटू
गटशिक्षणाधिकारी अनीलराव शिंदे साहेब डॉ संजय काळे दत्ताजी जगताप विठोबा निंबाळकर तुकाराम शेलार महारुद्र तांबे विनोद खेतमाळीस प्रशांत एरंडे सुधाकर हिरवे राजकुमार इथापे गोपाळराव डांगे मनोज कसरे विशाल चव्हाण सविता शिंदे रेश्मा डांगे राजेश राऊत अनिकेत झिटे मनिषा काकडे
वाचक क्रमांक :