ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र घुले यांना राज्यस्तरीय सोमेश्वर साथी आयकॉन पुरस्कार जाहीर
                      
                
            
               By : Polticalface Team ,Sun Feb 20 2022 09:37:07 GMT+0530 (India Standard Time)
       
               
                           
              परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष तथा ग्रामसेवक हरिश्चंद्र घुले यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा राज्यस्तरीय सोमेश्वर साथी आयकॉन पुरस्कार जाहीर झाला. दै.सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड यांनी पुरस्काराची नुकतीच एक पत्राद्वारे घोषणा केली आहे. 
             ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष तथा आदर्श व कर्तव्यतत्पर ग्रामविकास अधिकारी हरिश्चंद्र घुले यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत यावर्षीचा मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय सोमेश्वर साथी आयकॉन पुरस्कार जाहीर झाला आहे. हरिश्चंद्र घुले यांनी 1997 ते 2003 पंचायत समिती ता.खेड, जि.रत्नागिरी, अंतर जिल्हा बदली परळी पंचायत समिती येथे कार्य करीत आहेत.पंचायत समिती येथे माजलगाव पाच वर्षे तसेच परत परळी पंचायत समिती  येथे कर्तव्य व काम केले आहे. आपले काम प्रामाणिकपणे काम करणारे आहेत. काळ वेळेचे भान न ठेवता शब्दशः २४ तास नागरीकांसाठी आणि समस्या सोडवण्यासाठी देत आहेत. तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात, अगदी सामान्य माणसांची ओळख त्यांना ओळख आहे. प्रशासनातही चांगले व कर्तबगार ग्रामविकास अधिकारी म्हणून ओळख आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात "जनता कर्फ्यू लागू झाल्यापासून  त्याच्या कार्य क्षेत्रातील गावात कोरोना विरोधात आघाडी उघडली. गावात चोहीकडे स्वच्छता मोहीम राबवली, सर्व भागात निर्जंतुकीकरण करून घेतले. घरोघरी जाऊन जनजागृती केली तर कोरोना रोगाची लक्षणे सांगणारी पोस्टर्स लावण्यात आली. एवढेच नव्हे तर  नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे ग्राम पंचायतने नागरीकांना मोफत मास्कचेही वाटप करण्यात आले. जनजागृती करण्यात आली. कोरोना संदर्भात अथक परिश्रम घेत आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडविण्यास सर्वाेतोपरी नेहमीच सहकार्य करतात. तसेच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे काम उल्लेखनीय कार्य करतात. त्यांच्या प्रामाणिक कार्याची तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला. गुरुवार,दि.24 फेब्रुवारी रोजी बी रघुनाथ सभागृह, परभणी येथे एकता सेवाभावी संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिक्षण महर्षि मा.पं. शंकर प्रसाद अग्निहोत्री (अध्यक्ष जय महाकाली शिक्षण संस्थान, वर्धा) यांचा परभणी नगरीत सत्काराचे आयोजन करण्यात आले असून तसेच एकता इंटरनॅशनल फिल्म प्रोडक्शन निर्मित संविधान एक रास्ता या चित्रपटाचा शुभमुहूर्त व दै.द सोमेश्वर साथीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या ३१ व्यक्तिंचा राज्यस्तरीय सोमेश्वर साथी आयकॉन पुरस्कार २०२२ वितरण सोहळा समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उद्योजक तथा निर्माते संविधान एक रास्ताचे  अरूणजी मराठे, परभणीचे मा.खा.तुकाराम रेंगे पाटील, परभणी पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहनराव आव्हाड व हैद्राबाद येथील हिंदी चित्रपट अभिनेता अदनान साजिद खान उर्फ गुल्लु दादा प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ तज्ञ अँड अशोक सोनी, परभणी मनपा अध्यक्ष स्थायी समिती गुलमिर खान, कलमानधन समिती अध्यक्ष प्रा.डॉ.अशोक जोंधळे, साहित्यक व समाजसेविका सौ.संगिताताई जामगे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संयोजक एकता सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष अजमत खान, दै.द सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड, सहनिर्माते संविधान एक रास्ताचे सुरेश हिवराळे, एकता सेवाभावी संस्था विदर्भ अध्यक्ष अनिल नरेडी, एकता सेविभावी संस्था, परभणी जिल्हाध्यक्ष  अरूण पडघन, एकता सेविभावी संस्था, परभणी शहर जिल्हाध्यक्ष सईद अन्सारी उपस्थित राहणार आहेत. सदरील पुरस्काराचे  विशेष समारंभात वितरण करण्यात येणार आहे. स्मृतीचिन्ह, सन्मान पत्र , शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.  ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र घुले यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सामाजिक, धार्मिक, राजकीय , ग्रामसेवक, शासकीय अधिकारी व कर्मचारी, शैक्षणीक, पत्रकार, राजकीय क्षेञातील मान्यवर, मित्र परिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष