काष्टी येथे भर दुपारी दरवाजा तोडून सुमारे 15 तोळे सोने व रिव्हॉल्वर चोरी

By : Polticalface Team ,Sun Feb 20 2022 09:43:16 GMT+0530 (India Standard Time)

काष्टी येथे भर दुपारी दरवाजा तोडून सुमारे 15 तोळे सोने व रिव्हॉल्वर चोरी काष्टी वार्ताहरः श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी वांगदरी रोडवर (लहारेपट) येथे राहणारे माजी सैनिक जालिंदर रामदास पाचपुते( वय ४८)यांच्या घराचा भर दुपारी दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यानी घराच्या कपाटातील सुमारे पंधरा तोळे सोने व रिव्हाल्वर चोरुण नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. दि.१९ रोजी तालुक्यातील काष्टी( लहारेपट) येथे भर दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास सेवानिवृत्त माजी सैनिक जालिंदर रामदास पाचपुते हे गावचा आठवडे बाजार व शिवजयंती असल्यामुळे गावात बाजारला आले होते.व घरातील महिला शेतातील काम करण्यासाठी शेतावर गेल्या असताना मागे घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजे व कुलपे कटावणीने तोडून घराच्या कपाटातील सुमारे पंधरा तोळे सोने व नितृत्ती नंतर स्वतःच्या संरक्षणासाठी घेतलेला रिव्हाल्वर चोरीला गेल्याने गावात एकच खळबळ उडाली घटनेनंतर बंधू ग्रामपंचायत सदस्य मेजर चांगदेव पाचपुते यांनी पोलिसांना खबर दिली, घटनास्थळी पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पहाणी व पंचनामा करुण तपासाची चक्रे वेगाने फिरवत खबऱ्या मार्फत तपास सुरु केला आहे. आदिकचा तपास करण्यासाठी नगर येथून श्वानपथक बोलावून आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न केला परंतु काष्टी वागंदरी रस्त्याच्या कडेला हे घर असल्याने रस्त्यावर जास्त वाहतूक असल्याने श्वानाला पुढे मार्ग दाखविता आला नाही. श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असुन भरदिवसा झालेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडून भितीचे वातावरण तयार झाले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी