शेतकऱ्यांचे उपोषण थकीत पाणीपट्टी कमी करुन देऊ
कुकडीच्या अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन
By : Polticalface Team ,Wed Feb 23 2022 09:13:10 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनिधी /श्रीगोंदे = तालुक्यांतील विसापुर लाभक्षेत्रातील लोणीव्यंकनाथ शिवारातील एल वन वितरकेचे 8 शेतकऱ्यांनी सुमारे 90 एकरासाठी शिवशंभो पाणी वापर संस्थेचे पाणी वापरले आहे शिवशंभो पाणी वापर संस्थेची पाणी पट्टी कमी संबंधित शेतकऱ्यांकडून वसुल करण्यात येणार आहे
माजी उपसभापती गणपतराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली नागवडे साखर कारखान्याचे संचालक डी आर काकडे दिलीप काकडे गोरख जठार विठ्ठलराव जठार लियाकत तांबोळी भाऊसाहेब डांगे पोपट खोमणे उत्तम लगड यांनी कुकडी प्रकल्प विभागीय कार्यालया समोर उपोषण केले
शिवशंभो पाणी वापर संस्थेची चार लाख पाणीपट्टी थकली यामध्ये आठ शेतकऱ्यांनी पाच वर्षे संस्थेच्या पाण्यातून पाणी वापरले आहे त्यामुळे चार लाख इतकी पाणी पट्टी थकली आहे ही पाणीपट्टी कमी करुन मिळावी अशी मागणी शिवशंभो पाणी वापर संस्थांचे चेअरमन गणपतराव काकडे यांनी केली
या संदर्भात आमदार बबनराव पाचपुते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घ्या अशा सुचना कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांना दिल्या त्यानंतर
कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी शिवशंभो पाणी वापर संस्थेची थकीत पाणी पट्टी कमी करुन देणे संदर्भात लेखी आश्वासन
वाचक क्रमांक :