श्री शिवशंभो प्रतिष्ठान गाव शेल्डी तर्फे 19 फेब्रुवारी2022 रोजी अतिशय उत्साहामध्ये भव्य दिव्य अशी शिवजयंती साजरी
By : Polticalface Team ,Wed Feb 23 2022 16:21:30 GMT+0530 (India Standard Time)
रत्नागिरी: ज्या राजांनी आपले आयुष्य हे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी.....रयतेच्या कल्याणासाठी....माता भगिनींच्या रक्षणासाठी घालवले त्या राजांची आठवण, त्यांचे विचार जनमाणसात पोहचावेत.. स्मरणात राहावेत...आजच्या पिढीला त्यांच्या पराक्रमाची.... विचारांची शिदोरी मिळावी आणि त्यांच्या आचार.. विचारांना आदर्श मानून आपले जीवन जगावे यासाठी गाव शेल्डी, तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते..
3 वर्षांपासून या विचारांनी प्रेरित होऊन गावातील सर्व शिवभक्तांनी एकत्र येऊन शिवजयंती उत्सव चालू केला. छोट्या अंकुराच वटवृक्षात रुपांतर व्हावं तसं या शिवजयंतीची भव्यदिव्यता वाढत गेली. जसं स्वराज्या मध्ये एक एक मावळा मनापासून स्वराज्यात आला.... तसंच या शिवजयंतीला एक एक शिवभक्त मनापासून गोळा झाला आणि या शिवजयंतीची चौथ्याच वर्षात भव्यदिव्यता वाढत गेली.
आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठे ही अशा प्रकारची भव्य शिवजयंती साजरी केली जात नाही जी आज माझ्या शेल्डी गावामध्ये साजरी केली जाते याचा गावातील सर्वांनाच सार्थ अभिमान आहे.
गेली 3 वर्ष आपण प्रतापगडावरून शिवज्योत आणली जाते यावर्षी शिवभक्तांचा उत्साह लक्षात घेऊन प्रथमच हिंदवी स्वराज्याची राजधानी श्रीमान रायगडावरून शिवज्योत आणण्यात आली .
शिवज्योत देत असताना त्या रायगडावरील पुजाऱ्यांचे ते वाक्य..... "रायगडावरून किमान साडेतीनशे शिवज्योती ठीकठिकाणी नेल्या जातात परंतु शेल्डी गावातील श्री शिवशंभो प्रतिष्ठानचे पहिले मावळे तुम्ही आहात की, जे ही शिवज्योत अनवाणी म्हणजे पायामध्ये पादत्राणे न घालता घेऊन जात आहात " असे उद्गार त्यांनी काढले हाच खरा आपला शिवभक्त असल्याचा आनंद.... परंतु हा आनंद तेव्हा द्विगुणित होईल जेव्हा त्यांच्या विचाराने आपण आचरण करू असे सर्वांनी निश्चिय केला..
शिवजयंतीच्या नियोजनाची सुरुवात दोन महिने आधीच सुरु झाली होती. जशी शिवजयंती जवळ आली तसे एक एक शिवभक्त वाढत गेला.... या शिवजयंतीसाठी गावातील सर्व शिवभक्त होतेच पण मुंबई, पुणे या ठिकाणावरून ही अनेक शिवभक्त गोळा झाले. मुंबई, पुणे, अहमदाबाद, दुबई या ठिकाणावरूनही अनेक शिवभक्तांनी वस्तूच्या स्वरूपात.... पैशाच्या रूपात मोलाची मदत केली. त्याचबरोबर अनेक मान्यवर... अनेकांचे मित्र मंडळी, नातेवाईक व गावातील सर्व ग्रामस्थ.... व आपण सर्व शिवशंभो प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी आर्थिक स्वरूपात खारीचा वाटा उचलला...
गावातील शिलेदारांनी आर्थिक स्वरुपात खारीचा वाटा उचललाच पण..... श्रमदानाने या शिवजयंती स्थळाची भव्यता वाढवली. रस्त्यावरील सुबक रांगोळ्या... गडाची प्रतिकृती असलेला भव्य प्रवेशव्दार.... महिला वर्गाने शेणाने घातलेला प्रांगणातील सडा... यातूनच शिवजयंतीची भव्यता दिसून आली. हे करत असताना अनेक ग्रामस्थांचे मार्गदर्शन केल.
स्रोत : सुविध पवार
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.