अमृतमहोत्सव अमृताचा
By : Polticalface Team ,Fri Feb 25 2022 19:48:41 GMT+0530 (India Standard Time)
सन १८९७ चे दशकाचा कालावधीचे आसपासचा म्हणजे स्वातंत्र्य पुर्व कालखंडात जरी इंग्रजांचे राज्य भारत देशावर असले तरी खेड्यापाड्यात जणजीवन फार हालाखीचे नव्हते.भरपुर शेतजमिनी, भव्य व प्रशस्त चिरेबंदी घरं, भव्य दोन माड्या, राजवाडे शोभावे असं महालच,गावाला भक्कम तटबंदी,भव्य वेशी,गावात भुयारीवाडे अशी ऐतिहासिक मांडणी असलेले मौजे पिंपरी(म्हातार)तालुका श्रीगोंदा हे गाव. येथे श्री मारूतराव बाबुराव हिरडे श्री नागनाथ बाबुराव हिरडे, श्री रखाराम बाबुराव हिरडे या तीन बंधुचा गुण्या गोविंदाने नांदत असलेला कौटुंबिक परिवार वडील बाबुराव हिरडे यांचे कृपाछत्रा खाली आनंदाने बहरत होता. बाबुराव हिरडे एक भारदस्त, करारी, मुत्सुदी, बाणेदार, व पशुधनाचा व्यापार करणारं व्यक्ततिमत्व.साधारण तिनशे एकर शेतजमिन,बैल गाई,म्हशी,शेळ्या असी १५०-२०० जणारं वैभवसंपन्न मालक. मोठा मुलगा मारूतराव हेही शेती करूण वडील बाबुराव हिरडे यांचेबरोबर व्यापाराची धुरा सांभाळत. मारूतराव यांचा विवाह बेलवंडी बु. येथील सुखसंपन्न काळाने परिवारातील हौसाबाई यांचेशी विवाह झाला.या उभतांना कमलाबाई, अमृतराव, बबनराव,सुमन, पदम,रत्नमाला हि पाच अपत्य झाली. श्री अमृतराव यांचा जन्म दि. १/३/१९४७ ला झाला. ज्यांचा आज ७५वा जन्मोत्सव. ### श्री अमृतराव (तात्या)मारूतराव हिरडे परिवारातल थोरलं अपत्य, सहाजिकच इतरांच्या वाट्याला येतं ते लाड, कोड-कौतुक भाऊंचे वाट्याला पुरेपुर आलं. हिरडे परिवार शेती व्यवसायासह, दुधदूभतं,घोडा गाडी(टांगा) व जणावरांचा व्यापार यामुळे सुखी संपन्न व श्रीमंत होता. पण लाडाकोडात वाढत असतानाच त्यांची हुशारी झाकत नव्हती.त्यावेळी श्रीमंताची मुलं फारशी शाळेत रमत नसत.पण ते शाळेत चांगलेच रमले.शाळा व कॉलेज बी. ए. आॅनर्स पर्यंत #भाऊ# सरळ शिकले. हिरडे परिवाराचा राजकारणात वावर होताच. अहमदनगर जिल्हा सह. बॅंकेत भाऊ सेवेत दाखल झाले.श्रीगोंदा तालुका व इतरत्र सेवा करतानाच भाऊ शाखाधिकारी झाले. चांगली सेवा व तप्तरता हयामुळे ग्राहकांचे ते आवडते साहेब झाले. इकडे कौटुंबीक रोपटही पत्नी सौ. शशीकला वाजे-हिरडे यांच्या रूपानं वाढत होतं.जिवन वेलीवर कन्या बेबीताई , मुलगे महेश व संतोष हि अपत्य आहेत. ते उच्च शिक्षित आहेत. डॉ. संतोष यांचीही वेगळी ओळख डॉक्टरी पेशात जणमानसात व समाजामध्ये झाली. हिरडे परिवार आज समाजामध्ये जो वेगळ्या उंचीवर आहे. त्यामध्ये भाऊंनी त्यांच्या कुटुंबावर केलेले चांगले संस्कार होय. परम पुज्य मोरेदादा गुरूमावली व स्वामी समर्थाचा अध्यात्मिक वारसा जपनारं कुटुंब. परमार्थिक दिशा देणारं सामाजिक हित जपणारा परिवार ही भाऊंची संस्कार पेरणीच होय. आज समाजात श्री महेश, डॉ. संतोष हि भावंड काम करतात वडीलकीनं केलेले सुसंस्कारच होय.आजपर्यंतच आयुष्य अत्यंत आनंदानं व उत्साने जगत आले आहेत.
सौ. शशीकला अमृतराव हिरडे तात्यासाहेबच्या सुविद्यपत्नी या एक शांत, सोज्वळ, व अध्यात्मिक स्वभाव असलेले व्यक्तीमत्व. प्रत्येक गोष्ट अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेवून मगच तीची सुरूवात करणार. श्री अमृतराव (तात्यासाहेब) यांना अत्यंत खंबीर साथ देत प्रापंचिक वाटचाल केली. मुलगी मनीषा,मुले महेश(बंडूनाना), डॉ. संतोष यांचेवर अत्यंत सुसंस्कार करून त्यांना सुसंस्कृत, अध्यात्मिक बनविले. मनिषाताई हिस बी. एस्. सी. बी. एड्. डी. एम. एल. टी. शिक्षण दिले. तसेच तिचेसाठी सुंदर, सालस, सोज्ज्वळ उच्च शिक्षित असं डॉ.प्राध्यपक श्री सुनिल पुराणे हे यथोचित स्थळ शोधून विवाह बध्द केले.
सौ. मनिषा सुनिल पुराणे-पाटील (जामखेड) एक शांत, संयमी सोज्ज्वळ,सालस,समंजस व्यक्तीमत्व. प्रा. सुनिल सर्वसुखसंपन्न परिवार, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, अध्यात्मिक परिपुर्ण आदर्श वाटावा असा परिवार मनिषाताई व सुनिलजी पुराणे यांनी उभा केला आहे. किती सुंदर श्रीमेधा, श्रीतेजा कन्यारत्न, श्रीकर गोंडस, हुशार,शांत, संयमी सोज्ज्वळ, सालस नातवंड आहेत.जावई डॉ. सुनिल पुराणे जे आज अत्यंत सुस्थितीत जिवन व्यतित करत आहेत.
मोठा मुलगा महेश(बंडूनाना) श्रीगोंदा तालुका स्वामी समर्थ सेवा केंद्राची सर्व जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. योग्य व चांगला सल्ला सेवेक-यांना देत असतात. घरचे शेतीला विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकीचा जोड देवून भरघोस उत्पादन शेतीतून घेतात. आदर्श सेवेकरी व शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून बंडूनाना प्रख्यात आहेत.
डॉ. संतोष हिरडे हे श्रीगोंदा शहरातील प्रख्यात व ख्यात किर्ती पावलेले डॉक्टर आहेत. प्रथम पासूनच गोरगरिबांना वैद्यकीय सेवा देत आले आहेत. सर्व जग कोरोणाचे महामारीत होरपळत असताना डॉ. संतोष यांनी मात्र आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र कोरोना रूग्णांना सेवा श्रीगोंदा शहरात सेवा दिली. पहिले व दुसरे लाटेत प. पु. मोरे दादा हॉस्पिटल कोरोना रूग्णाचा मायेचा आसरा ठरले. कोणत्याही गोर गरिब रूग्णास पैशा साठी कधीच सेवा नाकारली नाही. जेवढे कोरोना रूग्ण त्यांचेकडे दाखल झाले तेवढे रूग्ण बरे होवून हसत आपले घरी गेले आहेत. व म्हणूनच त्यांना कोरोना काळातील उत्कृष्ट सेवेचे विविध पुरस्कार मिळाले आहेत. सुनबाई हर्षला व विद्या दोघीही विद्याविभूषित आहेत सासरे तात्यासाहेब व सासु शशीकला यांना आई-वडिलकीचे नात्याने जपतात.झिंजाडे,काळाने, लबडे परिवार, नातू हर्षवर्धन,श्रीपाद, श्रीधर व यशवर्धन आजोबांवर जिवापाड प्रेम करतात. गोकुळातील वैभव संपन्न असा आदर्शवत असा हिरडे परिवार आहे. अमृतरावांचे आज अमृतमहोत्सवा निमित्त पुढील शतकमहोत्सवासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.