कोळगाव आणि परिसरातील नागरिकांचे श्रध्दा स्थान असलेल्या महादेव मदिरात महाशिवरात्री उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

By : Polticalface Team ,Sun Feb 27 2022 18:35:24 GMT+0530 (India Standard Time)

कोळगाव आणि परिसरातील नागरिकांचे श्रध्दा स्थान असलेल्या महादेव मदिरात महाशिवरात्री उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव आणि परिसरातील नागरिकांचे श्रध्दा स्थान असलेल्या महादेव मदिरात दिं १ मार्च रोजी होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या यात्रा उत्सवासाठी शंभू महादेव मित्र मंडळ आणि ग्रामस्थ सज्ज झाले असून अनेक भाविकांची येथे दर्शना करिता गर्दी असते. मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या यात्रा उत्सवासाठी शंभू महादेव मित्र मंडळ, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत प्रशासन विशेष नियोजन केले असून महादेव मंदिरात मागील अनेक वर्षाा यात्रा उत्सव साजरा होत आहे. मात्र काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेल्या महादेव मंदिराचा ग्रामस्थांच्या मदतीने जीर्णोद्धार करून शंभू महादेव मित्र मंडळाने १२ वर्षापूर्वी मंदिराच्या आवारातील बुजत चाललेली बारव पुन्हा स्वच्छ करून बारवेची स्व खर्चातून तसेच श्रमदानातून डागडुजी करून बारवेचे पूनिरोज्जीवन करत बारवेला पुन्हा तीचे वैभव प्राप्त करून दिले.मंदिराचे पूर्वेकडील पडलेले प्रवेश द्वार टप्प्याटप्प्याने दुरुस्त करत जसेच्या तसे रूप देत त्याला आकर्षक रंग देऊन पूर्ण केले. चालू वर्षी शंभू महादेव मित्र मंडळाने मंदिराला आकर्षक असे रंग रांगोटी केली असून या साठी सुमारे १ लाख ५० हजार रुपये भाविकांच्या मदतीने खर्च केले असून रंग रांगोटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा यात्राउत्सव दोन दिवस भरत असून पाहिल्या दिवशी पहाटे महादेवाच्या पिंडीच्या अभीषेकाने सुरुवात होऊन मंदिरात शिवलीला अमृत वाचन होत असते. मंदिरात दिवसभर भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. संध्याकाळी महादेवाचा फटाक्यांच्या आतिषबाजित छबिना निघतो. या भाविकांसाठी प्रसाद म्हणून मागील काही वर्षा पासून परिसरातील शिक्षक खिचडीचे वाटप करतात तर दुसऱ्या दिवशी लपशीच्या प्रसाद वाटप केला जातो. हा यात्राउत्सव यशस्वी होण्यासाठी दौलत डुबल, बाळासाहेब पवार, धोंडीबा मेहेत्रे, राजु लगड, कोंडीबा गायकवाड, रामदास गायकवाड, माणिक लगड, मच्छिंद्र काळे, शेखर नलगे, बबन सरोदे यांच्यासह शंभू महादेव मित्र मंडळाचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ अहोरात्र प्रयत्न करत आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी