दत्ता मामांनी डिकसळकरांसाठी केले ४ कोटी मंजूर ; ग्रामस्थांनी चक्क घोड्यावरून काढली मामांची मिरवणूक
By : Polticalface Team ,Sun Feb 27 2022 19:54:33 GMT+0530 (India Standard Time)
इंदापूर(प्रतिनिधी तनवीर जमादार ):
डिकसळ गावच्या विकासाकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची शनिवारी (दि. २६) हलगीच्या निनादात घोड्यावरुन जंगी मिरवणूक काढली.
डिकसळ येथील ४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन व समारंभाच्या निमित्ताने मंत्री भरणे त्याठिकाणी गेले असता ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक करत जंगी स्वागत केले.
प्रसंगी बोलताना राज्यमंत्री भरणे यांनी डिकसळ येथील पुलासाठी ५५ कोटी रुपये मंजूर करत असल्याचे घोषित करून गावच्या सर्वांगीण विकासाकरिता भरघोस निधी दिला जाईल त्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, युवक अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर, माजी सरपंच रावसाहेब गवळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
वाचक क्रमांक :