ज्या लोकांना छोटे-मोठे व्यवसाय सुरू करायचे आहेत. आशा लोकांना बॅंकेच्या माध्यमातून कर्ज प्रकरणे उपलब्ध करून द्या- मा. सुनील धिवार
By : Polticalface Team ,Mon Feb 28 2022 16:22:43 GMT+0530 (India Standard Time)
वडगाव निंबाळकर-अमोल गायकवाड :
बॅंकेच्या माध्यमातून ज्या लोकांना छोटे-मोठे व्यवसाय सुरू करायचे आहेत. आशा लोकांना बॅंकेच्या माध्यमातून कर्ज प्रकरणे उपलब्ध करून द्या. असे मत बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार यांनी जेऊर येथील सत्कार समारंभा प्रसंग आपले मत व्यक्त केले.
पुरंदर तालुक्यातील जेऊर या ठीकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष पदी दिगंबर दुर्गाडे व कात्रज दुध संघाच्या संचालक पदी तानाजीराव जगताप यांची बिन विरोध निवड झाल्याबद्दल जेऊर येथील बहुजन हक्क परिषद यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.या प्रसंगी पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अध्यक्ष माणिकराव झेंडे, बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव कैलास धिवार, महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष पै नानासाहेब मदने,पुणे जिल्हाध्यक्ष संतोष डुबल ,बारामती तालुका कार्याध्यक्ष पांडुरंग घळगे , ग्रामपंचायत सदस्य तेजस जाधव , नाभिक समाज संघटनेचे जेऊर शाखेचे अध्यक्ष सागर तावरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिगंबर दुर्गाडे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना बहुजन हक्क परिषद ही संघटना सुनिल धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली बरे वर्ष झाले सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहे.त्या संघटनेमधील जे पदाधिकारी व कार्यकर्ते याचे काम अतिशय कौतुकास्पद आहे.या सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेचे मी मनापासून कौतुक करतो.सुनिल धिवार यांनी मला ज्या कर्ज प्रकरणा विषयी सांगितले आहे.त्याच मी नक्की विचार करेन आणि जेवढी कर्ज प्रकरण मला करता येथील तेवढी मी करुन देण्याचा मी प्रयत्न करीन यांची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल धिवार यांनी केले सूत्रसंचालन संतोष डुबल यांनी तर आभार कैलास धिवार यांनी मानले.
वाचक क्रमांक :