वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीगोंदा (प्रा.) यांचे कडुन जनहितार्थ सावधान आपण बिबटप्रवण क्षेत्रात आहात या भागात वावरताना घ्यावयाची काळजी

By : Polticalface Team ,Tue Mar 01 2022 10:09:02 GMT+0530 (India Standard Time)

वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीगोंदा (प्रा.) यांचे कडुन जनहितार्थ सावधान आपण बिबटप्रवण क्षेत्रात आहात या भागात वावरताना घ्यावयाची काळजी श्रीगोंदा:ज्या भागात मानव बिबट्या यांचा सातत्याने आमनासामना होत आहे अशा भागात राहणाऱ्या लोकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. बिबट्या दिसल्यास त्याच्या मागे पळू नये किंवा त्याचा पाठलाग करू नये अशा वेळी तो हल्ला करण्याची शक्यता असते. बिबट्या दिसला तर त्याचे मोबाईल वर चित्रीकरण करण्यासाठी जाऊ नये. बिबट्याच्या अति जवळ जाणे त्याने हल्ला केल्यास जीवघेणे ठरणारे असते. ज्या भागात बिबट्यांचा वावर आहे अशा भागात सायंकाळ नंतर एकटे फिरू नये किंवा लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये,बाहेर अंधारात उघड्यावर शौचाला जाऊ नये.रात्री शेतात पाणी देण्यास किंवा बाहेर जावे लागले तर सोबत जाड घुंगरे लावलेली काठी,विजेरी बाळगावी किंवा तीन चार च्या संख्येने जावे. निर्जन ठिकाणी एकट्याने जावे लागल्यास जाताना घरातील लोकांना कुठे जात आहात, किती वेळ लागणार आहे याची माहिती द्या. जाताना मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी वाजवत ठेवा,घराला चिकटून ऊसाचे क्षेत्र नसावे. यात सुरक्षित अंतर ठेवावे कारण बिबट्या ऊसात लपून बसलेला असतो. माळरानात गुरे चारावयास नेताना शक्यतो एकटे जाऊ नये. गुरांना नजरेच्या टप्प्यात ठेवावे. पाळीव जनावरांचे गोठे घरापासून थोडे दूर बांधून त्याला व घराच्या परिसराला मजबूत कुंपण करावे. घरच्या अंगणात व गोठ्यात शक्यतो सायंकाळ नंतर दिवे सुरु ठेवता येतील याची व्यवस्था करावी.शेतात पाणी भरण्यासाठी जाताना फटाके फोडावेत बिबट्या अचानक समोर दिसला तर घाबरून जाऊ नये.तसेच त्याच्या वाट्यास जाऊ नये. तो स्वताहून माणसांवर हल्ले करत नाही. बिबट्या विहिरीत पडला असेल किंवा कुणाच्या घरात शिरला असेल तर तिथे गर्दी करू नये. वन विभागाच्या कर्मचार्यांना त्यास तेथून काढताना अडचणी निर्माण होतात. अशावेळी गर्दीच्या गोंगाटाने बिथरलेला बिबट्या पळताना जमावावर हल्ला करू शकतो. बिबट्याची पिल्ले शेतात सापडल्यास त्यास उचलून आणू नये. मादी येऊन ती घेऊन जाते. आपण उचलून आणल्यास पिल्लांमुळे सैरभैर झालेली मादी माणसांवर हल्ला करू शकते.अशी सापडलेली पिल्ले आपण उचलून आणून आपण त्यांस जीवदान दिले अशी लोकांमध्ये भावना असते परंतु आपल्या अशा करण्याने त्यांची आई पासून ताटातूट होते. यामुळे हि पिल्ले फार काळ जगत नाहीत. बिबट्या दिसल्यास तत्काळ जवळच्या वनविभागाला माहिती द्यावी वन विभाग,रुग्णवाहिका,पोलिस तसेच आसपासच्या वस्तीवरील लोकांचे दूरध्वनी क्रमांक जवळ ठेवा. अनावधानाने काही घटना घडल्यास पटकन एकमेकांशी संपर्क साधता येतो. वस्ती जवळ रात्री बिबट्या आढळून आल्यास फटाके वाजवून पळवून लावावे.वन्य प्राणी आपला सहजीवी आहे,आपणच थोडी काळजी घेतली तर आपला बिबट्यांचा उभा ठाकलेला संघर्ष निश्चितच कमी होईल. बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास वनविभागाकडून त्या परिवारास व्यक्ती मृत झाल्यास पंधरा लाख रुपये, जखमी झाल्यास उपचारा चा खर्च देण्यात येते. पाळीव जनावरे मारली गेल्यास त्या शेतकऱ्यास आर्थिक मदतीचीही तरतूद आहे.मदतीसाठी खालील फोन नंबरवर फोन करा वन विभाग आपल्या मदती साठी सदैव तत्पर आहे श्री घालमे वनपाल श्रीगोंदा 9665607585 श्री पोटकुळे वनपाल उक्कडगाव 8010324764 9422315572 श्री गुंजाळ वनपाल मांडवगण 9579225503 रविंद्र भोगे वन परिक्षेत्र आधिकारी श्रीगोंदा
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.