पाटेठाण गावच इतिहासातील अस्तित्व शोधण्यास यश

By : Polticalface Team ,Tue Mar 01 2022 18:01:31 GMT+0530 (India Standard Time)

पाटेठाण गावच इतिहासातील अस्तित्व शोधण्यास यश दौंड: इतिहास हा अभ्यास करणाऱ्या लोकांचा आवडता विषय.त्यात आपण राहतो त्या गावचा इतिहास आणि आपल्या कर्मभूमीच इतिहासातील अस्तित्व शोधण्यासाठी इतिहास अभ्यासक नेहमी धडपडत असतात.अशाच धडपडीतून शिरूर-हवेली च्या सीमेवर असलेल्या भीमा नदीतीरावरील दौंड तालुक्याची हद्द असलेल्या पाटेठाण ह्या छोट्याशा गावाच ऐतिहासिक अस्तित्व शोधण्यास यश आलं आहे.पाटेठाण गावचे सुपुत्र आणि इतिहास अभ्यासक मंगेश गणेश गावडे या तरुणाने आपल्या गावाच नाव इतिहासाच्या पानातून शोधून गावाच्या ऐतिहासिक अस्तित्वाचे पुरावे जगासमोर मांडले. पाटेठाण हे गाव लोकवस्ती आणि क्षेत्रफळाने लहान असल तरी गावाची रचना,गावातील पांढरी (जुन्या वस्तीतील) मध्ये असलेली वाड्याची 10-12फूट उंचीची जोती,गावाच्या जुन्या अवशेषांचे पांढऱ्या मातीतील ढीग,नदीतीरावरील पुरातन यादवीस्थापत्यशैली चे महादेव मंदिर,त्यासमोरील चुन्याची जाती आणि गाड्याची चाक तसेच मंदिरासमोरील विरगळी हे गावातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या वास्तू पाहून गावाला इतिहासात नक्कीच महत्वाचं स्थान असेल हे जाणवते पण तसा उल्लेख व पुरावे असल्याशिवाय त्या वस्तुंना व वास्तूंना मान्यता देता येत नाही.ह्या गोष्ठी चा शोध घेत मंगेश नी शोध मोहिमेतून गावाचे इतिहासात असलेले उल्लेख शोधण्यात यश मिळवले. शके 1699 साली जेव्हा छत्रपती राजाराम महाराज यांची सत्ता महाराष्ट्र भर होती तेव्हा त्यांनी पाटेठाण ता.सांडस प्रांत पुणे हा गाव रामचंद्र नारायण यांच्याकडे होता तो राजश्री निळकंठ गोविंद गोसावी यांच्या ताब्यात दिला होता.तशा आशयाच पत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे प्रधान माधवराव नारायण यांच्या शिक्कानिशी आढळून आलं आहे. श्रीमंत रायरीकर खाजगीवाले यांच्या पत्रव्यवहारांच्या मोडी कागडपत्रानुसार निळकंठ गोसावी यांनी 17व्या शतकाच्या सुमारास पाटेठाण गावच पुरातन श्री नागेश्वर महादेव मंदिर जे जीर्ण होत त्याचा जिर्णोद्दार करून सरकारी शिबंधी साठी एक वाडा आणि पागा बांधल्याचा उल्लेख आढळून आला आहे. पुढं 1704 मध्ये तुकोजी होळकर यांनीं नीलकंठ गोसावी यांना पत्र पाठवून पाटेठाण गावात व परिसरात जो जकात,धान्य आणि वैरण गोळा केली होती ती त्या काळी असलेल्या मनाचीटी गावात पोहचविण्याची सोय करावी आणि पाटेठाण गावाला कसलाच उपसर्ग म्हणजे त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. अशी ताकीद दिल्याचं एक पत्र सुद्धा मोडीमध्ये आढळून आलं आहे. जेष्ठ इतिहास तज्ञ राजवाडे यांनी ह्या पत्राची लिप्यांतर करून ठेवली आहेत.भारतीय पुरातन इतिहास मंडळ येथे ही पत्रे पहायला मिळतात.
बातमी स्रोत:मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष