के.प्रा.शा.आष्टी नंबर 1 शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

By : Polticalface Team ,Wed Mar 02 2022 09:32:49 GMT+0530 (India Standard Time)

के.प्रा.शा.आष्टी नंबर 1 शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा आष्टी(प्रतिनिधी) सोमवार दि.28 फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध विषयावरील प्रयोगांचे सादरीकरण केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पवार सर तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अण्णासाहेब साबळे, केंद्रप्रमुख त्रींबक दिंडे उपस्थित होते.या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पत्रकार अण्णासाहेब साबळे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.यावेळी श्रीकांत कारंडे यांनी विज्ञानातील अनेक गमतीजमती व सिद्धांत विद्यार्थ्यांना स्पष्ट केले.यावेळी आबा मरकड यांनी प्रत्यक्ष प्रयोगाच्या प्रात्यक्षिकासह आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली व विज्ञानातील अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार साबळे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेत विज्ञानाची आवड व चिकित्सक वृत्ती,आजपासून प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे असा सल्ला दिला.त्याच बरोबर आपल्या शाळेमध्ये विविध उपक्रमांचे अत्यंत यशस्वी आयोजन करण्यात येते याबद्दल सर्व शिक्षक वर्गांचे व विद्यार्थ्यांचे पालक व पत्रकार म्हणून अभिनंदन केले.विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना सुरेश पवार यांनी विज्ञानाची गरज व प्रत्येक घटनेमागे व निसर्गातील घडामोडी मागे विज्ञानाचा संबंध आपण जोडून पाहिला पाहिजे,आणि चिकित्सक दृष्टीने विचार करण्याची क्षमता वृद्धिंगत करणे गरजेचे आहे,याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.त्याच बरोबर मुले हेच राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत आणि विद्यार्थ्यांना निसर्गातील निरीक्षण आणि त्यांच्या मनामधील असणाऱ्या शंका निरसन करण्यासाठी आपण समोर यायला पाहिजे व त्यांच्या निरीक्षण शक्तीला वाव दिला पाहिजे.उद्याचे भावी बालवैज्ञानिक आपण समोर बसलेले आहात आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा असे सांगून आयोजनाबद्दल सर्व बाल वैज्ञानिकांचे व शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले.यावेळी केंद्रप्रमुख त्रींबक दिंडे यांनी सर्व प्रयोगांची बाल वैज्ञानिकांकडून सर्व माहिती जाणून घेतली व सर्व विद्यार्थ्यांना बोलते केले.विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी व त्याचे विवेचन केल्याबद्दल सर्व बाल वैज्ञानिकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे केंद्रप्रमुख यांनी अभिनंदन केले.या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपक्रमशील शिक्षक बाळासाहेब तळेकर यांनी केले. यावेळी त्यांनी आपण विज्ञान शिकून चालणार नाही तर विज्ञान जगणे आवश्यक आहे व प्रत्येक घटनेतील वैज्ञानिक सत्य आपण जाणून घेतले पाहिजे,असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्योती गाडे यांनी केले.यावेळी कार्यक्रमास सुरेश पवार,नामदेव तावरे,तायराम गळगटे,धनंजय कुमठेकर,इला दंडवते,छबूबाई दहिफळे,शीला कातखडे, मायावती नावे,ज्योती गाडे,आबा मारकड,श्रीकांत कारंडे व पालक उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष