बांधावरील झाडे तोडल्यामुळे कलम ४२७ प्रमाणे श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
By : Polticalface Team ,Wed Mar 02 2022 11:09:44 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनिधी श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला येथील भिमानदी काठी असलेल्या गट नंबर २४२ मधील भानुदास महादेव मोरे यांच्या मालकीच्या शेतावरील बांधावर लावलेली नारळ, आंबा जातीची झाडे शेजारी असणाऱ्या अनिल गणपत मोरे,गोरख संपत मोरे, सुनिल विठ्ठल मोरे, सर्व राहणार सांगवी दुमाला ता.श्रीगोंदे यांनी तोडून टाकली आहे,त्यांच्या विरोधात कलम ४२७ प्रमाणे श्रीगोंदे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे .मात्र श्रीगोंदे पोलिसांनी या प्रकरणी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.
सविस्तर माहिती अशी कि सांगवी गावातील गट नं २४२ मधील शेताच्या बांधावर भानुदास मोरे यांनी पाऊसामुळे व नदीच्या पाण्यामुळे बांधावरील माती वाहून जावू नये म्हणून आंबा व नारळ हे फळझाडे लावली होती परंतु शेजारी असणाऱ्या अनिल मोरे,गोरख मोरे,सुनिल मोरे यांनी शेतातील बांधावर लावलेली सर्व झाडे परवानगी न घेता कारण नसताना तोडून टाकली असल्याने त्याच्या विरोधात श्रीगोंदे पोलिस ठाण्यात दि.१७ फेब्रुवारी २०२२ रोजी तक्रार दाखल केली आहे मात्र अद्याप पोलिसांनी दखल घेतली नाही. त्यामुळे पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांनी दखल घेऊन झाडे तोडणाऱ्या आरोपीला अटक करावी अशी मागणी भानुदास मोरे यांनी केली आहे.
वाचक क्रमांक :