श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली गावचे सुपुत्र शहीद सुभेदार ज्ञानेश्वर मोरे अनंतात विलीन

By : Polticalface Team ,Wed Mar 02 2022 18:11:10 GMT+0530 (India Standard Time)

श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली गावचे सुपुत्र शहीद सुभेदार ज्ञानेश्वर मोरे अनंतात विलीन श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली गावचे सुपुत्र शहीद सुभेदार ज्ञानेश्वर सखाराम मोरे 23 मराठा लाईट इन्फंट्री येथे देश सेवेत कार्यरत असता दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ ला सायंकाळी वीरमरण आले.त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी एरंडोली याठिकाणी आले व त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार २ मार्च रोजी ११ च्या दरम्यान त्यांच्या गावी एरंडोली या ठिकाणी झाले. शहीद सुभेदार ज्ञानेश्वर मोरे यांनी 23 मराठा लाईट इन्फंट्री मधे 18 वर्षे सेवा पूर्ण करून, दोन वर्ष जादा सेवा करून पुन्हा सहा महिने देश सेवा करत असताना यादरम्यान देशसेवा करत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात वडील सखाराम गोविंद मोरे,आई सुलाबाई सखाराम मोरे,पत्नी सुरेखा ज्ञानेश्वर मोरे,मुलगा महेश ज्ञानेश्वर मोरे (वय २० वर्षे) मुलगी अर्पिता ज्ञानेश्वर मोरे (वय १५ वर्ष) तसेच भाऊ तुकाराम सखाराम मोरे व इत्यादी त्यांचा त्यांच्या पश्चात परिवार आहे. हा अंत्यविधी शासकीय इतमामात पार पडला गावाच्या शिवे पासून ते अंत्यविधीच्या ठिकाणापर्यंत सुभेदार ज्ञानेश्वर मोरे अमर रहे, भारत माता की जय,वंदे मातरम, अशा घोषणांच्या जल्लोषा मध्ये त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली,२७ फेब्रुवारी या दिवशी त्यांची शहीद झालेली बातमी गावामध्ये कळताच तेव्हापासून त्यांचा अंत्यविधी ०२ मार्च पर्यंत गावातील सर्व व्यवसायिकांनी आपले व्यवसाय स्वयंपूर्ण पणे बंद ठेवले होते, गावामध्ये एकच दुखाचे सावट पसरले होते, एरंडोली गाव व पंचक्रोशीतील तसेच श्रीगोंदा तालुक्यातील अनेक नागरिक या अंत्यविधीसाठी उपस्थित होते, अंत्यविधीसाठी ग्रामपंचायत मार्फत अंत्यविधीच्या ठिकाणी दोन ते तीन एकर चा सर्व परिसर साफसफाई करून घेतला होता.यावेळी श्रीगोंदा पोलीस स्टेशन बेलवंडी पोलीस स्टेशन यांच्या वतीने शासकीय इतमामात रायफल च्या फायरिंग करत मानवंदना करण्यात आली तसेच अहमदनगर आर्मी कॅम्प मधून आलेल्या जवानांच्या मार्फत शहीद सुभेदार ज्ञानेश्वर मोरे यांना लष्करी स्वरुपात रायफल च्या फायर करत मानवंदना देण्यात आली, यावेळी परिसरातील अनेक महाविद्यालयातील शाळेमधील एन.सी.सी चे विद्यार्थी तसेच पोलिस मित्र संघटना याही स्वयंपुर्ती उपस्थित होत्या, यावेळी शहीद मोरे यांच्या वडिलांनी शेवटी आपल्या दाटलेला कंठामधुन माझा मुलगा देशासाठी शहीद झाला याचा मला सार्थ अभिमान आहे, असे बोलत असताना उपस्थित सर्वच जनसमुदायाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, यावेळी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,नायब तहसीलदार , माजी आमदार राहुल दादा जगताप,राष्ट्रवादीचे नेते घनश्याम आण्णा शेलार,जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे,प्रतिभाताई बबनराव पाचपुते,अण्णासाहेब शेलार,त्रिदल संघटनेचे संदीप लगड,मा.कॅप्टन प्रभाकर धेऊरकर,बेलवंडी पोलीस स्टेशनचे उप,पोलीस निरीक्षक बोत्रे साहेब,शंकर पाडळे, दिणुकाका पंधरकर,सतीश धावडे,सचिन कातोरे,त्रिदल चे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संदीप सांगळे, सामाजिक कार्यकर्ते खंडू इथापे,माऊली हिरवे,सावता हिरवे,संभाजी महाराज दरवडे,युवराज पवार,संग्राम पवार,हेमंत नलगे,माजी सभापती पुरुषोत्तमभैय्या लगड,परिसरातील आजी माजी सरपंच पदाधिकारी कार्यकर्ते, आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. अंत्यविधीच्या दरम्यान आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने अहमदनगर शहरामधील चालू असलेल्या उड्डाणपुलाला शहीद सुभेदार ज्ञानेश्वर सखाराम मोरे असे नाव देण्याची मागणी आजी माजी सैनिकांकडून व संघटनांकडून करण्यात आली आपल्या श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली गावचे भूमिपुत्र यांना भारत देशाचे संरक्षण करताना वीर मरण आले शहीद झाले, सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या शहीद स्मारकासाठी एक लाख रुपये देण्याचे काम करणारा आहोत - माजी आमदार राहुलदादा जगताप
एरंडोली गावचे भूमिपुत्र शेतकरी कुटुंबातील आसणारे शहीद सुभेदार ज्ञानेश्वर मोरे हे आपल्या देशाचे संरक्षण करताना त्यांना वीरगती प्राप्त झाली त्यांच्या स्मारकासाठी लागेल ती मदत करण्यास नागवडे कुटुंब सदैव तयार आहे, :- सौ.अनुराधाताई राजेंद्र नागवडे (संचालिका अहमदनगर जिल्हा बँक)
श्रीगोंदा तालुक्यातील शहीद जवान ज्ञानेश्वर मोरे देश सेवा व कर्तव्य बजावत असताना शहीद झाले, त्यांच्या स्मारकासाठी योग्य तो निधी उपलब्ध करून देणार आहे.तसेच अहमदनगर येथे उड्डाणपुलाला शहीद मोरे यांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा करणार तसेच श्रीगोंदा तालुक्यात आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने शहीद भवनासाठी योग्य ती शासनाची जागा देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे - श्री.घनश्याम आण्णा शेलार ( प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य
शहीद सुभेदार ज्ञानेश्वर मोरे हे देश सेवा बजावत असताना शहीद झाले, मोरे परिवाराच्या दुःखामध्ये पाचपुते परिवार सहभागी आहे, शहीद मोरे यांच्या स्मारकासाठी आमदार निधी मधून निधी उपलब्ध करून देणार,तसेच आजी-माजी सैनिकांच्या मागणीनुसार तालुक्यामध्ये शासकीय जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी शहीद भवन तयार करण्यासाठी श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनदादा पाचपुते यांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देणार :-सौ.प्रतिभाताई बबनराव पाचपुते(मा.जिल्हा परिषद सदस्य )
आमच्या एरंडोली गावचे सुपुत्र शहीद सुभेदार ज्ञानेश्वर मोरे हे देश सेवा बजावत असताना शहीद झाले,त्यांच्या शहीद स्मारकासाठी ग्रामपंचायत च्या वतीने योग्य ती मदत करून शहीद ज्ञानेश्वर मोरे यांच्या प्रथम वर्षश्राद्धा च्या आत मध्ये शहीद स्मारक तयार करण्याचा निर्धार एरंडोली ग्रामपंचायत ने केला आहे - श्री. संजय इथापे (सरपंच एरंडोली)

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष