कोविड लसीकरण दरम्यान निष्काळजीपणामुळे मृत्युप्रकरणात वैद्यकीय आधिकारी-शालेय व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करा,जिल्हाधिका-यामार्फत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, प्रधान सचिवांना तक्रार

By : Polticalface Team ,Wed Mar 02 2022 18:55:24 GMT+0530 (India Standard Time)

कोविड लसीकरण दरम्यान निष्काळजीपणामुळे मृत्युप्रकरणात वैद्यकीय आधिकारी-शालेय व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करा,जिल्हाधिका-यामार्फत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, प्रधान सचिवांना तक्रार आष्टी प्रतिनिधि: कोविड लसीकरण मोहिम शाळेतील १५ वर्षावरील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील अनेक शाळेत कोविड लसीकरण मोहिम राबविण्याचे काम जोमात सुरू झाले. यात आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा येथील शाळेतही लसीकरण मोहिम ८ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आली होती. या लसीकरण मोहीमेदरम्यान शाळेतील १४ वर्षीय विद्यार्थीनी मेघा शिवाजी आटोळे हिला लस दिल्यानंतर ती अस्वस्थ झाली. त्यानंतर तिची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते. मेघाला लहानपणापासूनच एसएलई नावाचा आजार होता. याची माहिती काही दिवसांपूर्वीच वडिल शिवाजी यांना मिळाली होती. त्या दृष्टीकोनातून नगर जिल्ह्यातील डॉक्टरकडे मेघावर उपचार सुरू होते. दरम्यान तिला लस देण्यात आली त्यातच तिची प्रकृती खालावली परंतु उपचारादरम्यान तब्बल २८ दिवसानंतर रविवार, दि.१३ रोजी मृत्यू झाला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून लसीकरणामुळे मेघाचा मृत्यू झाला नसला तरी मेघाचा मृत्यू अनेक प्रश्न उपस्थित करून गेला. प्रशासनाने निष्काळजीपणा बद्दल सखोल चौकशी करण्याची गरज आहे. मेघा शिवाजी आटोळे ही इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होती. ८ जानेवारी रोजी त्यांच्या शाळेत कोविड लसीकरण मोहिम राबविण्यात आली. कोविड लस दिल्यानंतर मेघा अस्वस्थ झाली, तरी तिला पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यातआले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू या प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह लावून गेला. मेघाचे वडील शिवाजी आटोळे यांनी मोबाईलवरून माहिती देताना सांगितले की, माझ्या मुलीला जुनाट आजार होता मान्य आहे परंतु लसीकरण दरम्यान ती आजारी असल्याचे सांगतानाही तिला लस का देण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला. शिवाय लसीकरण करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टिम सोबत असते तर मग या डॉक्टरांनी मेघाची शारीरिक चाचणी का केली नाही. दरवर्षी शाळेत आरोग्य तपासणी मोहीम असते, या मोहीमेत मेघाला जुना आजार आहे हे का दिसून आले नाही. मेघा १४ वर्षे ३ महिन्याची होती, लसीकरण मोहीम १५ वर्षाच्या वरील विद्यार्थ्यांसाठी होती तर मग मेघाला लसच का दिली. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल संबधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
शालेय तपासण्या केवळ नावालाच का?? अक्षम्य हलगर्जीपणा जबाबदार कोण??
शालेय आरोग्य तपासणीवर प्रश्नचिन्ह जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत दरवर्षी शालेय आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे कदाचित शालेय आरोग्य तपासणी झाली नसावी पण मेघा शिवाजी आटोळे ही मुलगी नववी वर्गात शिक्षण घेत होती तर या नऊ वर्षात संबंधीत शाळेत शालेय आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात आली नाही का? जर शालेय आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली तर मेघाला एसएलई नावाचा आजार होता हे शालेय आरोग्य तपासणीत का आढळून आले नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.शालेय आरोग्य तपासणीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
लसीकरण १५ वर्षावरील विद्यार्थ्यांसाठी होते...मग कमी वय असणा-या मेघाला लस देण्यास जबाबदार कोण??
कोविड लसीकरण मोहीम राबविण्याचे काम जोरात सुरू आहे. सध्या शाळेतील १५ वर्षावरील विद्यार्थ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्या दृष्टीकोनातून पाहिले तर मेघाचे वय १४ वर्षे ३ महिने आहे तर मग तिला लसच का देण्यात आली.विशेष म्हणजे मेघाचे वडील शिवाजी आटोळे यांनी माझी मुलगी आजारी आहे, तिच्या पायावर सुज चढलेली आहे तिला एसएलई नावाचा आजार असून त्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती दिल्यानंतरही ही लस देण्यात आली असा आरोप मुलीच्या वडीलांनी केला असून यास जबाबदार कोण??
सक्तीच्या लसीकरणास जबाबदार कोण???
माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे सक्तीचे आदेश शाळेतील १५ ते १८ वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना पहिला डोस तात्काळ द्या. जर ९० टक्के विद्यार्थ्यांना १७ फेब्रुवारीपर्यंत डोस दिला नाही तर जिल्हाधिकारी यांच्याकडे शाळा बंद करण्याचा प्रस्ताव प्रस्तावित आहे असे सक्तीचे आदेश माध्यमिक शिक्षण अधिकारी व प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी काढले होते. शाळा बंद होणार या धास्तीने तर नव्हे ना पंधरा वर्षाखालीलही विद्यार्थ्यांना डोस देण्यात आले. लसीकरणाबाबत अशा प्रकारची सक्ती आदेश काढणे योग्य आहे का जर सक्ती नसती तर सक्तीचे लसीकरण झाले नसते आणि कदाचित मेघाचे प्राण वाचले असते.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर मो. नं.८१८०९२७५७२

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.