आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची महत्वाची बैठक

By : Polticalface Team ,Wed Mar 02 2022 20:18:20 GMT+0530 (India Standard Time)

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची महत्वाची बैठक पाथर्डी प्रतिनिधी: अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा कुठल्याही दिवशी होऊ शकते या निडणुकीसाठी इच्छुकांची मते जाणून घेण्यासाठी व जिल्हातील पक्ष बांधणी संदर्भात जिल्हा व तालुक्यातील कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय महामेळावा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. हा महामेळावा अभूतपूर्व असा व्हावा यांसाठी जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.या महामेळाव्याच्या तयारीसाठी मनसे पक्ष कार्यालय मुंबई येथुन मनसेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर,सचिन डफळ व मनसेचे नगर उत्तर जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे व संपूर्ण जिल्हाभरात या समितीचा दौरा चालू आहे.याच अनुषंगाने या समितीची पाथर्डी शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांबरोबर महत्वाची बैठक ४ मार्च रोजी सकाळी १०:०० वा.शासकीय विश्रामगृह,पाथर्डी येथे आयोजित करण्यात आलेली आहे. याबाबत अधिक माहिती देतांना मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांनी सांगीतले की, मागील वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण पाथर्डी तालुक्यात मनसे ने नेत्रदीपक कामगिरी बजावलेली आहे, त्यामुळें येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही पक्ष सरस कामगिरी करेल असा विश्वास कार्यकर्त्या मध्ये आहे. नगर परिषद,पंचायत समिती मध्ये नेहमी तेच ते पदाधिकारी निवडून देण्याची मानसिकता आता मतदारांमध्ये नाही,जनता आता नवीन,उत्साही व सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्याला या सर्वसामान्य नागरीकांच्या दैंनदिन गरजाशी निगडीत असलेल्या ठिकाणी पाठवणार आहे व मनसे या दृष्टीने एक चांगला पर्याय नागरिकांसमोर देणार आहे. पाथर्डी तालुका स्तरावर शुक्रवारी होत असलेल्या पक्षाच्या या महत्वाच्या बैठकीसाठी व त्यानंतरच्या मा.बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखालील महामेळावा साठी जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात येत असुन या बैठकीनंतर पक्षाच्या शहर व तालुका कार्यकारणी मध्येही अनेक बदल घडवुन नवीन होतकरू तरुणांना संधी देण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे तरी ४ मार्च च्या या अतिशय महत्वाच्या बैठकीसाठी पक्ष प्रवेशासाठी नवीन इच्छुक कार्यकर्त्यांनी व पक्षाच्या सर्व पदाधिकऱ्यांनाही उपस्थित रहावे, असे आवाहन मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यानी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी