पाथर्डीत जनता विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

By : Polticalface Team ,Thu Mar 03 2022 21:35:54 GMT+0530 (India Standard Time)

पाथर्डीत जनता विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी शहरातील जनता विद्या मंदिरच्या सन १९८७ च्या बॅच मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा दुसरा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल 33 वर्षांनी हे विद्यार्थी २०१९ ला एकत्र आले होते. त्यानंतर हे सर्व विद्यार्थी पुन्हा एकत्र येऊन, जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.शालेय जीवनातल्या सर्व आठवणींनी सर्व माजी विद्यार्थी भारावून गेले होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुखदेव शिंदे, मिनीनाथ झाडे, देविदास पारखे,किशोर पारखे, विजय भगत, सदाशिव खेडकर, कारभारी खेडकर,गोरख खाडे यांनी एकत्र येऊन स्नेहमेळाव्याचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केले होते. सरस्वती पुजनानंतर आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे मीनाक्षी साळवे- शेरकर हिने स्वागत गीताने सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक सुखदेव शिंदे यांनी केले.नंतर कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचा सत्कार संजय भंडारी व सीमा भंडारी यांनी प्रत्येकाला गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. त्यानंतर मनोगत व्यक्त करण्यात आले. मनोगताची सुरुवात (पी-आय )विठ्ठल बडे यांनी केली. कारभारी खेडकर याने याही वयात आलेल्या संकटाकडे सकारात्मक दृष्टीने कसे बघायाचे ? हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. त्यानंतर प्रत्येकाने आपल्या वर्गातील आठवणींचा साचलेला बांध मोकळा केला. मनोगत ऐकत असताना सर्व माजी विद्यार्थी अगदी भारावून गेले होते. माजी विद्यार्थ्यात पोलीस इन्स्पेक्टर, हवालदार, पोलीस प्राध्यापक, शिक्षक, कोर्टातील अधिकारी, कंपनीतील अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, मोठ- मोठे व्यवसायिक, शेतकरी, मजूर,ऊसतोडणी कामगार अशा सर्व प्रकारच्या सर्व स्तरांमधून मित्र-मैत्रिणी चा मेळावा एकत्र जमला होता.दिसायला एवढी मोठी दरी होती, पण कुठेही भेदाभेदला थारा नव्हता. आपण सर्व एकाच वर्गात बसलेले विद्यार्थी आहोत, हा पवित्र भाव मात्र या कार्यक्रमात क्षणाक्षणाला दिसून येत होता. शेतातल्या मजूराने जेव्हा पोलीस दलातील उच्च अधिकारी असलेले विठ्ठल बडे यांना मिठी मारली, तेव्हा हे अनुपम दृश्य बघून नेत्र सुख घेत होते. विष्णुमय जग वैष्णवांचा। धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ। हा भाव प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला. यानंतर दुपारी सर्वांनी मिष्ठान्न भोजनाचा मनमुराद आस्वाद घेतला.सर्वजणां सोबत बसून मन मोकळेपणाने ,अस्थेने एकमेकाशी हितगुज करत होते. हे दृष्य अतिशय भावस्पर्शी होते. भोजनानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात भजने, गवळणी, विनोद, लावणी, चित्रपटातील गाणी, उखाणे अशा सर्व प्रकारच्या कलागुणांना वाव मिळाला. त्यामुळे संसाराच्या ओझ्याखाली दडलेलं हे आयुष्य कसं विसरायचं हे एका दिवसाने दाखवून दिले .जीवनामध्ये मुक्तछंद आनंद कसा घ्यावा, हे या गेट-टुगेदर च्या कार्यक्रमातून सगळ्यांना समजलं. शेवटी सुखदेव शिंदे यांनी निरोपाचे गीत घेऊन पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.कारभारी याने सर्वांचे आभार मानले आणि सर्व मित्र आणि मैत्रिणी यांनी जड अंतकरणाने निरोप घेतला. वेगवेगळ्या दिशेने आलेले मित्र आपापल्या गावी नवी उर्जा घेऊन गेले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.