स्पंदन खाकाळ याने राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले

By : Polticalface Team ,Thu Mar 03 2022 21:38:57 GMT+0530 (India Standard Time)

स्पंदन खाकाळ याने राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आष्टी (प्रतिनिधी): आष्टी तालुक्यातील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पिंपळेश्वर विद्यालय पिंपळा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अंभोरा येथील रहीवाशी संदिप रघुनाथ खाकाळ यांचा मुलगा चि.स्पंदन संदीप खाकाळ याने राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये रौप्य पदक (सिल्वर मेडल) मिळवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. चि.स्पंदन संदिप खाकाळ हा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल लोणी या ठिकाणी इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असून तो सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र स्टेट फील्ड फेडरेशन मार्फत राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये शाळेच्या वतीने सहभागी झाला होता. या स्पर्धेमध्ये स्पंदन खाकाळ याने रौप्त पदक पटकावले असून दि.२४ मार्च २०२२ पासून होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी चौदा वर्षांखालील गटात त्याची निवड झाली आहे. आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासह क्रिडा क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत आहेत हे यापूर्वीही अनेकवेळा सिद्ध झालं आहे. मागील काही वर्षात शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित पिंपळेश्वर विद्यालय पिंपळा येथील मुलींचा कबड्डी संघ क्रीडा शिक्षक सुनिल वाळके, दिलीप सरोदे, नानासाहेब जगधने यांच्या मार्गदर्शनामुळे सलग तीन वर्षे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेता होऊन पिंपळा सारख्या ग्रामीण भागातील मुलींनी कबड्डीच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन बीड जिल्ह्यासह आष्टी तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचवले होते. आता त्याच विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक संदिप खाकाळ यांचे चिरंजीव स्पंदन यानेही राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत रौप्य पदक मिळवून यश संपादन केल्याने स्पंदन खाकाळ या विद्यार्थ्याच्या खास यशाबद्दल खा.सुजय विखे पाटील, आष्टी, पाटोदा, शिरुर का. विधानसभा मतदारसंघाचे नेते मा.आ.भीमराव धोंडे साहेब, डॉ.अजय दादा धोंडे, जेष्ठ संचालक विठ्ठलराव बनसोडे, माजी कार्यकारी संचालक दिलीपराव काळे, जेष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे, आष्टी पं.स.गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, अहमदनगर येथील शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.शिवाजी आण्णा कराळे, माजी जि.प.सदस्य सुखदेवराव खाकाळ, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे संचालक महादेव आमले, पिंपळेश्वर विद्यालयाचे प्राचार्य विष्णू विधाते, अंबेश्वर विद्यालयाचे शिक्षक सोन्याबापु खाकाळ सर, नानासाहेब जगधने सर, तुषार काळे सर, प्रा. अनिल खुरंगे सर, सुनिल वाळके सर, तळेकर सर, अजिनाथ औटे सर, कोतकर सर, गाडे सर, शिंदे सर, सोनवणे सर, यांच्यासह अहमदनगर व बीड जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व इतरांनी अभिनंदन करुन पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी