कृषी महाविद्यालयात रेशीम उत्पादन तंत्रज्ञान प्रकल्प पूर्ण
By : Polticalface Team ,Fri Mar 04 2022 18:18:48 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी प्रतिनिधी
आष्टी येथील छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालयात कृषी कीटकशास्त्र विभागामध्ये आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांचे रेशीम उत्पादन तंत्रज्ञान प्रकल्प पूर्ण झाले महाविद्यालयांमध्ये एक एकर क्षेत्रावर व्ही वन या सुधारित जातीच्या तुतीची तीन वर्षापूर्वी 4 बाय 2 फूट या अंतरावर लागवड केलेली आहे तसेच 40 बाय 20 फुटाचे किटक संगोपन गृह बांधलेले आहे महाविद्यालयांमधील आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय बीड येथून 800 रुपयांचे 50 अंडीपुंज आणले होते सुरुवातीला अंडयामधुन मधून अळ्या बाहेर आल्यानंतर त्यांना तुतीची पाने कापून टाकावी लागतात साधारणता तिसऱ्या अवस्थे नंतर त्याला दिवसातून दोन वेळा पाला टाकला जातो तसेच निर्जंतुकीकरणासाठी तिसऱ्या अवस्थेपर्यंत अळ्या वर पाच ग्रॅम पर 100 अळी चौथ्या-पाचव्या अवस्थेमध्ये दहा ग्रॅम पर 100 अळी विरी गेलेल्या चुना पावडरची धुरळणी करावी तसेच धुरळणी कात टाकणे व कोष गुंडाळण्याच्या अवस्थेत करू नये .साधारणता तीस दिवसांमध्ये अळ्या कोष मध्ये जातात 50 अंडीपुंजापासून 40 किलो कोष निर्मिती होऊन बाजारामध्ये पाचशे ते सहाशे रुपये किलो दर मिळतो विद्यार्थ्यांनी दोन बॅच मध्ये 80 किलो कोष तयार झाले. सदर प्रकल्पा साठी प्रकल्प अधिकारी प्राध्यापक काळे पी आर आणि प्राध्यापक मिसाळ एल एस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रकल्पामध्ये विद्यार्थी पोठरे वंदना, कोकाटे वर्षा, काकडे राम, मानकर विशाल, लोखंडे ऋषिकेश ,गणेश कवलिंगे, माने दिनेश , शीतल सोनेकर , यांनी सहभाग घेतला संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. डी बी राऊत आणि प्राचार्य डॉ.आरसुळ एस आर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी