शेतकऱ्यांना पुर्ण क्षमतेने विज द्यावी- शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे

By : Polticalface Team ,Sat Mar 05 2022 09:33:20 GMT+0530 (India Standard Time)

शेतकऱ्यांना पुर्ण क्षमतेने विज द्यावी- शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे पाथर्डी प्रतिनिधी: महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना पैसे भरण्यासाठी तगादा लाऊन ज्याप्रमाणे सक्तीची शेतकऱ्यांकडून विज बिल वसुली केली, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पुर्ण क्षमतेने व पुर्ण वेळ विज मिळत नाही. त्यामुळे ज्या प्रमाणे विजबिल वसुलीसाठीच तत्परता दाखवली, त्या प्रमाणे भारनियमन मुक्त पुर्ण क्षमतेने पुर्ण वेळ विज शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने द्यावी, तसे आदेश महावितरण कंपनीस महाराष्ट्र शासनाच्या वतीने उर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरण कंपनीस काढावेत व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अहमदनगर राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा किसान मोर्चाचे अहमदनगर दक्षिणचे सरचिटणीस शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी पत्राद्वारे उर्जामंत्री नितीन राऊत यांना केली आहे. ढाकणे यांनी पत्रात म्हटले आहे की,गेली दोन वर्षापासुन पाऊस चांगला आहे. त्यामुळे बागायत क्षेत्र वाढले असुन ऊस लागवडीचे प्रमाण वाढले आहे. विहीरीस पाणी आहे .परंतु विज वेळेवर व पुर्ण क्षमतेतेने येत नसल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी विद्युत रोहीत्र जळाल्यानंतर ताबडतोब विद्युत रोहीत्र बदलून देत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके महावितरण कंपनीच्या हालगर्जीपणामुळे वाळुन जाऊन पिंकांचे अतोनात नुकसान होत आहे. महावितरणच्या या हलगर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी असुन देखील पुर्ण क्षमतेने पुर्ण वेळ विद्युत मिळत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना पुर्ण क्षमतेने व पुर्ण वेळ विद्यूत देण्यासाठी आपण तातडीने निर्णय घेऊन महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने पुर्ण वेळ शेतीसाठी विद्यूत देण्यासाठी आदेश द्यावेत आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी उर्जामंत्री राऊत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.