परळीत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा- संजय मुंडे

By : Polticalface Team ,Sat Mar 05 2022 20:58:13 GMT+0530 (India Standard Time)

परळीत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा- संजय मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या शिबिराचा शहरातील गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे यांनी केले आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या संकल्पनेतून शिबीर होत आहे. ६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात हे शिबीर होणार आहे. या शिबिरात स्त्री रोग, बालरोग, र्‍हदय रोग, त्वचा रोग, नेत्र रोग, कान - नाक - घसा, अस्थी रोग, जनरल सर्जरी, दमा व छातीचे विकार, दंत रोग, मुत्रविकार, अस्थी रोग आदींची तपासणी करून औषधोपचार केले जाणार आहेत. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होऊन रूग्णांची तपासणी, उपचार करणार आहेत. शिबीरामध्ये तपासणी झाल्यानंतर रूग्णांचा आजार व गरजेनुसार डाॅक्टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी