नांदुरमध्यमेश्वर आरोग्य उपकेंद्रामुळे गावातच मिळणार उपचार
By : Polticalface Team ,Mon Mar 07 2022 14:24:39 GMT+0530 (India Standard Time)
निफाड: तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर येथे होणाऱ्या नवीन आरोग्य उपकेंद्रांमुळे गावातील नागरिकांना वेळेत आरोग्य सुविधा या उपकेंद्राच्या माध्यमातून मिळणार असून, आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी मोठी मदत होणार आहे. नागरिकांनी एकोप्याने गावाचा विकास साधावा असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले आहे.
आज निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर येथील आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती सुरेखा दराडे, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, पंचायत समिती सदस्य शिवाजी सुरासे, नांदुरमध्यमेश्वरच्या सरपंच उज्वला डांगले, बाळासाहेब पुंड, शांताराम दाते, उप विभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोविडमुळे विकासकामांचा वेग मंदावला होता. परंतु आता कोविड आटोक्यात आहे. त्यामुळे विकासकामांना गती देण्यात येत असून ती टप्याटप्याने तात्काळ पुर्ण करण्यात येतील. तसेच जिल्ह्याला जिल्हा नियोजनाच्या मंजूर निधीतून ६५ टक्के निधी जिल्हा परिषदेला दिला जात असल्याने विकासाची कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केला जात आहे. असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
गावातील शेतकऱ्यांनी महावितरणमार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वीजेची देयके भरुन अधिकाधिक सुविधांचा लाभ करुन घ्यावा. तसेच गावातील विजेच्या समस्या तात्काळ सोडवण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
यावेळी सुरेखा दराडे, अमृता पवार आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून गावातील समस्या मांडल्या व त्या सोडविण्याची मागणी यावेळी त्यांनी पालकमंत्री श्री. भुजबळ यांना केली. याकार्यक्रमाचे प्रास्ताविक शांताराम दाते आणि सुत्रसंचालन वसंत पानसरे यांनी केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी