शेतकऱ्याचे काळीज: भाग 1- मंगेश गावडे

By : Polticalface Team ,Mon Mar 07 2022 15:03:34 GMT+0530 (India Standard Time)

शेतकऱ्याचे काळीज: भाग 1- मंगेश गावडे "पप्पा, मी थांबतो धाऱ्यावर,तुम्ही जाऊन या दूध काढायला" "जमेल का पण तुला?" "जमेल की पप्पा, तुम्ही जा आणि लवकर धारा काढून या" "बरं जातो, तू नीट लक्ष दे" "हो,पप्पा" हा संवाद होता शेतातील एका पिता पुत्राचा, श्रीपत राव आणि त्यांचा मुलगा आज बराच वेळ शेतात उसाला पाणी देत होते.श्रीपत यांची शेती कमी होती त्यामुळे पशुपालन करून दूध व्यवसाय ते करायचे.संध्याकाळ होऊ लागली तशी त्यांची मनाची घालमेल वाढली होती,उसाला पाणी देणे गरचेच पण धारा पण महत्वाच्या त्यांची काळजी त्यांच्या 13-14 वर्ष्याच्या पोरानं बरोबर हेरली आणि मी लक्ष देतो तुम्ही जा म्हणून सांगितलं.नाईलाजाने श्रीपती धारा काढायला गेला. श्रीपत ला एकुलत एक पोरगं त्यामुळे शिकवायचं आणि मोठं करायचं हे त्याच्या डोक्यात,पोरगं पण हुशार होत,समजूतदार होत.बापाचं कष्ट आणि आईची वेदना त्याला समजत होती.लक्ष देउन ते अभ्यास करायच पण शेवटी कोवळ्या वयातील पोरगं शेतीभाती त्याला जास्त माहीत न्हवती.वडिलांना घरी पाठवलंय आणि आपल्याला आता पाणी द्यायचा ,त्याचा पहिलाच हा शेतातील प्रयत्न होता. पायातील बूट,मोजे त्याने काढून एका ठिकाणी सुरक्षित ठेवले,हातातलं स्मार्ट घड्याळ एकदा पाहिलं 6:30वाजले होते आज नेमका मोबाइल सोबत आणला न्हवता त्यामुळे टाइमपास होत न्हवता, एक एक सरी भिजवत ते आपण शेतकरी आहोत आणि शेती करत आहोत या धुंदीत काम करत होत. जस जसा वेळ जात होता तसा अंधार वाढत चालला होता,सर्वत्र उसाची शेती,लांब लांब पर्यंत कोणी माणूस दिसत न्हवता,हळू हळू समोरच दिसणं कमी होऊ लागलं होतं,दिवस मोठा आणि रात्र छोटी असल्याने अंधारही हळू हळू उजेडला गिळत होता.जस जसे अंधार वाढू लागला तसतसा पोराच्या मनात भीतीच वादळ उठू लागलं पण तरी मन घट्ट करत ते अंधारात पाणी देत होत. श्रीपत भरभर धारा काढत होता,आज त्याच लक्ष धारेवर न्हवत मनात वेगळंच काहूर माजल होत.खूप दिवसांनी पोरग रानात गेलं आणि नेमकं अंधारात पाणी धरतय,त्याला भीती वाटत असेल,अंधारात लांब लांबवर लोक नाहीत,उसामध्ये लांडगे,कोल्हे असतात,रानटी कुत्री पण रानात उंदरांच्या शिकारीसाठी फिरत असतात आणि माझं कोवळं पोरग एकटच रानात पाणी देतंय.बापाचंच मन ते,शेतातल्या अडचणी त्याला जास्त माहिती त्यामुळे भरभर धारा उरकत त्यांनी शेत गाठायचं ठरवलं. सात सव्वा सात वाजले तसं पोराच्या मनात भीती वाढू लागली,काळोख वाढला तशी त्याचा मनात घालमेल चालू झाली,अजून कशे पप्पा येईना म्हणून ते काळजीत पडलं.रातकिड्यांचा कर्कश आवाज त्या काळोखाला अजून भीतीदायक बनवत होता,कुठंतरी एखाध्या शेतात उसात लहान प्राणी हालचाल करायचे आणि त्याच्या आवाजाने शांत काळोख अजून भीती दाखवत होता.समोरच काही दिसत न्हवत पण तरी अंदाज घेत पोरग शेताला पाणी देत होत.मनात भीतीचा डोंगर उभा होता पण वडिलांना मीच घरी पाठवलंय,माज्या भरोस्यावर ते घरी गेलेत म्हणून तसच मन घट्ट करत ते अंधारात चाचपडत पाणी देत होत.सारं शिवार आता अंधारात गडुप झालं होतं,गार वाऱ्याची झुळूक यायची आणि पोराच्या माथ्यावर भीतीने जमा झालेले घामाचे गरम थेंब त्या वाऱ्याने थंड होऊन एक रोमांचकारी अनुभव देत होती. अचानक पोराला रस्त्याच्या बाजूने बॅटरी दिसली आणि एक आनंदाची लाट त्याच्या चेहऱ्यावर पसरली,सगळ्या काळोखात त्याला आता बाप दिसू लागला.मनावरच मोठं धडपण कमी झालं होतं,हळूहळू बॅटरी जवळ आली बापाने आवाज दिला आणि पोरग सुखावल.गेल्या तासभराच्या त्या अंधाऱ्या काळोखात त्याला फुटलेला घाम त्यान पुसला. एक नवा अनुभव घेऊन ते काहीतरी सापडल्याचा आवेशात खुश होत.काळोख्या अंधाराची भीती आठवून ते विचार करत होत माझा बाप अशा कित्येक राती अंधारात पाणी देत असतंय त्याला किती भीती वाटत असेल.मी त्याची ही भीती दूर करत त्याला अजून सुखी करण्यासाठी झटणाऱ हे मनात ठेऊन ते आपल्या विचारात रमल. लेखन-मंगेश गावडे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष