महिला शेतकऱ्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान हवे - शितल आरु

By : Polticalface Team ,Tue Mar 08 2022 14:50:53 GMT+0530 (India Standard Time)

महिला शेतकऱ्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान हवे - शितल आरु श्रीगोंदा: आज शेती क्षेत्रामध्ये सर्वात जास्त कष्ट महिला करतात परंतु पुरुषांच्या बरोबरीने त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नाही ,ते मिळायला हवे असे शितल आरु मंडळ कृषी अधिकारी श्रीगोंदा यांनी बोलताना सांगितले, आज जागतिक महिला दिनानिमित्त शेडगाव ( काशिनाथ नगर )येथे महिला प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमास शेडगाव चे उपसरपंच सोनल ताई भदे, मंडळ कृषी अधिकारी शितल आरु ,आत्मा प्रकल्पाचे संसाधन अधिकारी प्रियंका चौधरी, राजनंदिनी बचत गटाच्या अध्यक्षा सुरेखा म्हस्के आणि सचिव शुभांगी म्हस्के,अहिल्यादेवी बचत गट,सरस्वती बचत गट, हंसवाहिनी बचत गट या गटांच्या अध्यक्ष, सुनिता ताई गोरे ,वैशालीताई भदे ,मनीषाताई भुजबळ तसेच इतर ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, कार्यक्रमात महिलांच्या कृषी क्षेत्रातील संधी व कृषी विभाग योजना या विषयावर मंडळ कृषी अधिकारी शितल आरु यांनी मार्गदर्शन केले, त्यांनी सांगितले की शेतीमध्ये पिकांची लागवड करताना पूर्व मशागतीपासून तर पिकांच्या काढणीपर्यंत ची सर्व कामे महिला करतात परंतु मार्केटिंग किंवा विक्री व्यवस्थेमध्ये निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग अतिशय अत्यल्प असतो, तो वाढायला हवा, तसेच कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी प्राधान्याने राबवणार असल्याचे श्रीमती आरु यांनी सांगितले, तसेच पंतप्रधान अन्न प्रक्रिया प्रकल्पांतर्गत योजनांबाबत आत्माचे प्रकल्पाच्या संसाधन अधिकारी प्रियंका चौधरी यांनी मार्गदर्शन केले, प्रक्रिया उद्योगात महिलांनी पुढे येण्यासाठी महिला अधिकाऱ्यांची नेमणूक शासनाने आवर्जून केल्याचे प्रियांका चौधरी यांनी सांगितले,कार्यक्रमात बचत गटाच्या अध्यक्षा सुनिता गोरे यांनी बचत गटामार्फत महिलांसाठी राबवलेल्या विविध योजना व त्यातून झालेला फायदा या विषयी आपले मनोगत व्यक्त केले,उपसरपंच सोनल ताई भदे यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल उपस्थित महिलांचे व तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा कार्यालयाचे आभार मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी