वर्षाचा प्रत्येक दिवस हा स्रीसन्मानाचा असावा – कविता आव्हाड

By : Polticalface Team ,Wed Mar 09 2022 10:37:04 GMT+0530 (India Standard Time)

वर्षाचा प्रत्येक दिवस हा स्रीसन्मानाचा असावा – कविता आव्हाड पाथर्डी प्रतिनिधी: जागतिक महिला दिनाची सुरुवात महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी केलेल्या आंदोलनातून झाली असली तरी आजही समाजात स्रीला सन्मानासाठी झगडावे लागते, ही भूषणावह बाब नाही. जीवनात स्रीचे महत्व हे अनन्यसाधारण असून वर्षातून फक्त एक दिवस महिला दिन साजरा करून तिची महती नक्कीच गायली जाण शक्य नाही. यासाठी वर्षाचा प्रत्येक दिवस हा स्रीसन्मानाचा, स्रीच्या कलागुणांना वाव देणारा, तिची प्रतिष्ठा वाढवणारा हवा, असे प्रतिपादन येथील मैत्रेयी ग्रुपच्या अध्यक्षा कविता आव्हाड यांनी केले. त्या बाबुजी आव्हाड महाविद्यालयात जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित भव्य वेशभूषा स्पर्धा कार्यक्रमात बोलत होत्या. व्यासपीठावर उज्ज्वला शेवाळे, मोनिका गुगळे, रेखा कुचेरीया, कांचन येळाई, लीना गुगळे, कविता येळाई, शर्मिला गर्गे, अरुणा मंत्री, स्वाती गांधी, मीना निरहाळी, डॉ. लांडे आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या. कविता आव्हाड पुढे म्हणाल्या, महिलांच्या सकारात्मक विचारांचा प्रभाव त्यांच्या घरावर तसेच समाजावर पडत असतो. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. महिलांनी येथून पुढे सामाजिक कार्यासाठी अग्रेसर भूमिका घेऊन राष्ट्रबांधणीत आपला मोलाचा सहभाग नोंदवावा, अशा त्या शेवटी म्हणाल्या. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुली आणि युवतींसाठी येथील मैत्रेयी ग्रुपने भव्य वेशभूषा स्पर्धेचे आयोजन बाबुजी आव्हाड महाविद्यालयात करण्यात आले. प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थिनीपासून महाविद्यालयीन युवतींनी या स्पर्धेत भाग घेऊन वेगवेगळ्या वेशभूषा सादर केल्या. या स्पर्धेत प्राथमिक विभागात अनन्या तरवडे हिने प्रथम, श्रीजा तुपे हिने द्वितीय तर श्रुती शिरसीम हिने तृतीय क्रमांक मिळविला. माध्यमिक विभागात धनश्री वैद्य, राजनंदिनी परदेशी व पल्लवी खेडकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. जुनिअर विभागात सुवर्णा काटकर हिने प्रथम, श्रद्धा गर्जे हिने द्वितीय तर दर्शिका फलके हिने तृतीय क्रमांक मिळविला. सिनियर विभागात आदिती लोहकरे, सानिका फुंदे, ऋतुजा आव्हाड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेचे परीक्षण मयुरी धायतडक यांनी केले. याप्रसंगी अरुणा मंत्री, उज्ज्वला शेवाळे, मोनिका गुगळे, स्वाती गांधी यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाची विद्यार्थिनी शीतल राजेंद्र खेडकर हिची एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी भारतरत्न लता मंगेशकर यांना मैत्रेयी ग्रुपतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा पालवे, सुत्रसंचालन माया पवार तर आभार आम्रपाली कांबळे यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष