राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी बीड जिल्हा संघ रवाना
By : Polticalface Team ,Thu Mar 10 2022 21:43:03 GMT+0530 (India Standard Time)
दिनांक 9 बीड जिल्ह्यातील युवकांना मोठ्या प्लॅटफॉर्म वर खेळण्याची संधी मिळत नाही. फार कमी वेळा बीड जिल्ह्यातील खेळाडू राज्यस्तरीय किवा मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना क्वचितच दिसतात. अशा खेळाडूंना मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आर्थिक परिस्थिती व परिस्थितीशी झगडावे लागते. अशा उत्कृष्ट खेळाडूंची प्रथमच बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून निवड करून राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट नाशिक येथे स्पर्धेत बीड जिल्ह्याचा संघ आज रवाना होत आहे. तुमचा भरणा असलेल्या संघाला साबिर कंट्रक्शन, आनंद हार्डवेअर तथा क्लोथ सेंटर, एस वैद्य ग्रुप पाटोदा कडून पोंसर करण्यात आले आहे. सामाजिक भान जपण्याचे काम या नामांकित संस्थांकडून करण्यात आले. बीडचा संघ उत्कृष्ट कामगिरी करेल अशी चर्चा क्रिकेट प्रेमी जनतेत माझे रंगू लागली आहे.
वाचक क्रमांक :