सह्याद्री-देवराई वनविभागात महिनाभरात दुस-यांदा आग; वनविभागीय आधिका-यांना घटनेचे गांभीर्य नाही ,प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपुर यांना तक्रार

By : Polticalface Team ,Thu Mar 10 2022 21:50:26 GMT+0530 (India Standard Time)

सह्याद्री-देवराई वनविभागात महिनाभरात दुस-यांदा आग; वनविभागीय आधिका-यांना घटनेचे गांभीर्य नाही ,प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपुर यांना तक्रार बीड: जिल्ह्य़ातील वनविभागातील आधिका-यांना शासन कोट्यावधी रूपये वनविभागातील विविध कामावर खर्च करत असताना त्यात कागदोपत्रीच बोगस कामे दाखवुन मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करत असतानाच वनविभागातील ऊरल्यासुरल्या झाडांचे संरक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी पार पाडता येत नसुन सह्याद्री-देवराई परीसरात महिनाभरातच दुस-यांदा आग लागल्यामुळे कर्तव्यावर कसुर केल्याबद्दल वनविभागातील आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत विभागीय आयुक्त, प्रधान सचिव महसुल व वनविभाग, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख)कार्यालय नागपुर यांना केली आहे. महिनाभरातच सह्याद्री-देवराई वनविभागात दुस-यांदा आग सह्याद्री-देवराई परीसरात दि.१३ फेब्रुवारी रोजी आगीत झाडांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले अहतानाच महिना पुर्ण होण्याच्या आतच दि.९ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता वनपरिक्षेत्र, वनमंडळ बीड, नियतक्षेत्र पालवण, फाॅ.सव्हे नंबर ३७९ गावाचे नाव गौळवाडी (पा )कं.नं.३७८ रोपवनक्षेत्र २५ हेक्टर भाग-१,रोपनवर्षे २०१८-१९(एमपीडब्लु),२०१९-२० (एफवायओ) परीसरात आग लागली असुन अंदाजे १० एकरक्षेत्रातील ४०००-५००० झाडांचे जळुन नुकसान झाल्याचे बोलले जाते.. आग लागल्याची कल्पना देऊन सुद्धा वनविभागातील आधिकारी आलेच नाहीत,कामच करत नाहीत :-सुभाष मस्के आग लागली, ग्रामस्थांनी आग विझवली परंतु वनविभागातील आधिका-यांना फोनवरून कल्पना देऊन सुद्धा कोणीही आले नाही, कर्मचारी आधिकारी इकडे फिरकत नसल्याची तक्रार ग्रमस्थांनी केली असून वनविभागातील कर्मचा-यांना याचे गांभीर्य नसल्याची संतप्त प्रतिक्रीया दिली आहे आग विझवताना पंडीत साबळे, राहुल साबळे, किशोर काळे, वैभव काळे, वसंत काळे, बंडु शेंडगे, राजेंद्र गाडे, लक्ष्मण जाधव, मनोज भडंगळे, सतिश कळसाने, रामभाऊ पवार, सागर मस्के,भागवत मस्के, सुभाष मस्के आदि हजर होते. प्रधान सचिव महसुल व वनविभाग, मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपुर, विभागीय आयुक्तांना तक्रार वनविभागातील आधिका-यांवर जिल्हाप्रशासनाचा अंकुश नसुन जिल्हाधिका-यांनी १० वेळा वनविभागातील गैरव्यवहार प्रकरणात तक्रार, आंदोलनानंतर चौकशी अहवाल मागितल्यानंतर एकदाही अहवाल दिला नसल्याचे माहीती आधिकारात उघड झाले असून कागदोपत्रीच बोगस कामे दाखवुन वनविभागातील आधिका-यांनी संगनमतानेच कोरोना कालावधीत १० कोटी ८४ लाख रूपयांचा अपहार केला असून तक्रारीनंतर चौकशी व कारवाईच्या भितीने बेकायदेशीररीत्या पोकलेन, जेसीबी यंत्राच्या सहाय्याने राखीव वनविभागात कामे करणे तसेच वारंवार वनविभागात आगीच्या घटना संशयास्पद असुन संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री, वनमंत्री, प्रधान सचिव महसुल व वनविभाग, मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख)कार्यालय नागपुर,विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना केली आहे. डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर मो. नं.८१८०९२७५७२
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष