विद्यार्थ्यांनी जीवनात जिद्द व चिकाटी ठेऊन प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते-पोलीस उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव
By : Polticalface Team ,Sat Mar 12 2022 11:55:05 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनिधी / श्रीगोंदे : विद्यार्थ्यांनी जीवनात यश मिळविण्यासाठी जिद्द व चिकाटी ठेऊन प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास जीवनात यश नक्कीच मिळते, असे उदगार कर्जतचे पोलीस उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव यांनी काष्टी येथे बोलताना केले.
दि. ११ मार्च रोजी श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे जनता विद्यालयात आयोजित एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२२ च्या विद्यार्थ्यांच्या शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीगोंदे कर्जतचे पोलिस उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव हे होते. सुरवातीला कर्मवीर पूजनाने कार्यक्रची सुरुवात झाली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य माजी सभापती अरुणराव पाचपुते हे होते. प्राचार्य अशोक राठोड यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यालयाचा विद्यार्थी स्वप्निल भोयटे (इयत्ता ९ वी) याने स्वतः तयार केलेले पोलिस उपअधिक्षक जाधव यांचे रेखाचित्र देण्यात आले. विद्यार्थ्यांमधून जय नलगे व प्रसाद भुजबळ यांनी आपले मनोगत मांडले.
यावेळी अरुणराव पाचपुते यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी. कॉपी करू नये. प्रामाणिक काम ईश्वर पाहत असतो, त्यामुळे आपल्या प्रमाणिकतेला ईश्वर नक्कीच साथ देतो. आई वडिलांचे नाव मोठे करा. गावबद्दल प्रेमाची भावना बाळगून गावाचा परीसराचा नाव लौकिक वाढवा असा मौलिक संदेश दिला. परीक्षेला आमदार बबनराव पाचपुते, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य भगवानराव पाचपुते, बाळाप्पा राहिंज आदींनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
याप्रसंगी कला शिक्षक सुनिल शिंदे प्रास्तविक शिक्षक प्रतिनिधी हरिश्चंद्र शिंदे यांनी केले.सूत्रसंचालन.पठाण यांनी केले. विद्यालयाचे उपशिक्षक तोरडमल यांनी सर्वाचे आभार मानले.
वाचक क्रमांक :