धर्मवीरगड येथे बलिदान स्मृतीदिना निमित्ताने गडकोट संवर्धन मोहिमेचे आयोजन

By : Polticalface Team ,Sat Mar 12 2022 11:57:09 GMT+0530 (India Standard Time)

धर्मवीरगड येथे बलिदान स्मृतीदिना निमित्ताने गडकोट संवर्धन मोहिमेचे आयोजन श्रीगोंदा: छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिना निमित्ताने धर्मवीरगड ता. श्रीगोंदा येथे छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती च्या वतीने बलिदान स्मृती दिनी रक्तदान व नेत्ररोग निदान शिबीर तसेत किल्ले संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले.छत्रपती संभाजी राजांचा स्वाभिमान आणि निष्ठा,सत्य इतिहास लोकांपर्यंत पोहचवुन शंभुराजांच्या रक्ताने पवित्र झालेल्या गडाचे संवर्धन तसेत ज्या ठिकाणी औरंगाजेबाच सिंहासन होत त्याठिकाणी शंभुराजांच भव्य स्मारक व्हाव यासाठी छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती तत्पर असते. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाला आत्मग्रस्त शेतकरी पत्नी लताबाई पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन रक्तदान व स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली.बालशिवव्याख्याती देवयानी घरत,शिवव्याख्याते वैभव जाधव,राकेश पिंजण सरकार,शिवकवी वैभव सांळुखे यांनी शिवविचारांचा जागर केला.शिवकालीन मर्दानी खेळ आखाडयाच्या युद्ध कला प्रात्याशिकांनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी विवेक कोल्हे,रोहित भोसले,शासकिय क्षेत्रातील योगदानासाठी महेंद्र माळी,शैक्षणीक योगदानासाठी सतिष शिंदे यांना शंभु गर्जना पुरस्कार तर स्वयंभु युवा प्रतिष्ठाण,अग्निपंख फाऊंडेशन,शिवशंभु संघटना,शिवदु्र्ग संवर्धन समिती,हिंदुनृपती छत्रपती शाहु महाराज सोहळा समिती यांना विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आले. यावेळी जाधव घराण्याचे वंशज शिवाजी राजे जाधव,सरसेनापती येसाजी कंक यांचे थेट वंशज आकाशराजे कंक,दुधाई धाराऊमाता यांचे वंशज अमित गाढे,सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे वंशज कुणाल मालुसरे,सरलष्कर बहादुर शार्दुलसिंह नाईक निंबाळकर,संताजी घोरपडे यांचे वंशज रणधीर आप्पा घोरपडे,सेवा समिती परिवार चे मार्गदर्शक सरपंच आदेश शेठ नागवडे,पंचायत समिती सदस्य कल्याणी लोखंडे,राष्ट्रवादी युवक कॉग्रेंस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप कंद,श्रीगोंद्याचे तहसीलदार मिलींद कुलथे,नेत्र चिकित्सक प्रकाश बळवंत रसाळ आणि महाराष्ट्र भरातुन आलेले छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे पदाधिकारी,शिवशंभु भक्त उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.