वंचितच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी भोरू म्हस्के यांची तिसऱ्यांदा निवड

By : Polticalface Team ,Sun Mar 13 2022 13:08:09 GMT+0530 (India Standard Time)

वंचितच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी भोरू म्हस्के यांची तिसऱ्यांदा निवड पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी शहरातील बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर व महाराष्ट्र अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांचे सूचनेनुसार राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण व जिल्हाध्यक्ष प्रदीप बारसे यांनी पाथर्डी तालुकाध्यक्षपदी भोरू म्हस्के यांची निवड करण्यात आली. तसेच तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी भोरू म्हस्के बोलतांना म्हणाले, आज वंचित बहुजन आघाडीच्या पाथर्डी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष प्रदीप बारसे व राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि माझ्या वरती जी तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, ती आतापर्यंत प्रामाणिकपणे आणि सक्षमपणे पार पाडली. यापुढेही पार पाडणार असून तालुक्यात जास्तीत जास्त शाखा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आणि जास्तीत जास्त कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी या पक्षाशी जोडणारा आहे. तालुकाध्यक्षपदी ही माझी तिसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. यापूर्वी मी रास्तारोको, विविध आंदोलने, अत्याचाराविरुद्ध गोरगरिबांना न्याय देण्याचे काम केले. मी कोरडगावचा सरपंच म्हणून काम पाहिले, टायगर फोर्स संघटनेचे कामकाज मी पाच वर्षे केली. त्या माध्यमातून मी समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले, त्यामुळे माझी निवड करण्यात आली आहे, असे म्हस्के म्हणाले. यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. तालुका उपाध्यक्ष: विष्णू पडळकर, बाबासाहेब चव्हाण, सचिन डांगे, कैलास धनवडे, अरुण थोरात, संपत गायकवाड ,मिरी पगारे. संघटक: राजू दौंडे, बबन मुखेकर, बाळासाहेब गिरी. सल्लागार: दिलावर भाई बागवान, बन्शी नांगरे, विनायकराव देशमुख. पाथर्डी शहराध्यक्ष: अक्षय फेसपुते, शहर उपाध्यक्ष- श्रीकांत भोसले, प्रशांत चव्हाण, सुनिल जाधव ,सोपान भिंगारदिवे, आशीर्वाद कचरे. तिसगाव शहराध्यक्ष: आकाश साळवे. उपाध्यक्ष: मुस्ताफ शेख यांची निवड करण्यात आली. या निवडीच्या प्रसंगी शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलालभाई शेख, छानराज क्षेत्रे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, समीर बागवान, अश्पाक शेख, सतीश पालवे, नंदू आंधळे, मुकादम पवळे यांची उपस्थिती होती.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी