कै. सौ. सुनीताताई ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

By : Polticalface Team ,Sun Mar 13 2022 16:11:20 GMT+0530 (India Standard Time)

कै. सौ. सुनीताताई ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश पाथर्डी प्रतिनिधी: शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील कै.सौ. सुनिताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेज, शेवगाव या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिवाळी परीक्षा २०२१ मध्ये दैदिप्यमान यश संपादित केले आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा निकाल ९२.९१% तर द्वितीय वर्षाचा निकाल ९७.६८% तर तृतीय वर्षांचा निकाल ९३.३०% लागला असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. श्रीकांत ढाकणे यांनी दिली आहे. प्रथम वर्षातील फुंदे विशाल रामकिसन हा विद्यार्थी ८३.७१% गुणांसह प्रथम आला असून द्वितीय वर्षातून दांडगे सपना दादासाहेब ह्या विद्यार्थीनीने ८३.१३% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला आहे. तृतीय वर्षातून बड़े अभिषेक संजय हा विद्यार्थी ८९.६०% गुणांसह प्रथम आला आहे. ७६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून २९२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तंत्रनिकेतनचा एकंदर निकाल ९५ टक्के लागला आहे. प्रथम वर्ष सिव्हीलमध्ये बड़े विशाल (८३.७१%), द्वितीय वर्ष सिव्हीलमध्ये मथुरा येवले (७७.३३%) तर तृतीय वर्ष सिव्हीलमध्ये बडे अभिषेक ( ८९.६०%) गुणांसह प्रथम आले आहेत. प्रथम वर्ष कॉम्प्युटरमध्ये पवार संकेत (७२.७१%), द्वितीय वर्ष कॉम्प्युटरमध्ये दांडगे सपना (८२.१३% ) तर तृतीय वर्ष कॉम्प्युटरमध्ये जोशी जयंत (८३.६७%) गुणांसह प्रथम आले आहेत. तृतीय वर्ष ईअॅण्डटीसीमध्ये गायकवाड अविनाश (७५.७९%) गुणांसह प्रथम आले आहे. प्रथम वर्ष मेकॅनिकलमध्ये शेख फरदीन (७८.१४%), द्वितीय वर्ष मेकॅनिकलमध्ये हारदे शुभम (८२.११%) तर तृतीय वर्ष मेकॅनिकलमध्ये बर्डे प्रथमेश (७७.०५%) गुणांसह प्रथम आले आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या तासिका आणि प्रात्यक्षिक ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आले होते. नियमित सॅनिटायझेशन मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगच पालन, नियमित टेम्परेचर आणि ऑक्सीलेव्हल चेकींग करून कोरोनाला निर्बंध घालण्यात येत आहे. तसेच सर्व प्रशासकीय आणि अध्यापकीय कामकाज ऑनलाईन माध्यमातून करण्यात आले होते. नियमित तासिकांबरोबरच विद्यार्थ्याच्या शैक्षणिक अडीअडचणी सोडवण्यासाठी विभागप्रमुख प्रा. महेश मरकड, प्रा. सचिन म्हस्के, प्रा. संपदा उरणकर, प्रा. सुनिल औताडे यांनी विशेष प्रयत्न केले. प्रा. विश्वास घुटे, प्रा. संकेत मोटाले, प्रा. संदिप बोराळे, प्रा.पुजा गव्हाणे, प्रा. अश्विनी गोरे, प्रा. आसाराम भिसे, प्रा. प्रभुणे विलास, प्रा.शितल ब्राह्मणे विद्यार्थ्यांना नियमित तासिका, प्रात्यक्षिकांबरोबरच संबंधित विषयाचे अद्ययावत ज्ञान देण्यासाठी गुगल मीट, युट्यूब, पॉवर प्रेझेन्टेशन, स्कीलबेस्ड असाईनमेंट इत्यादी माध्यमातून विद्याथ्यांना प्रचलित परीक्षा पद्धतीबरोबरच एमसीक्यु पद्धतीने अधिकाधिक सराव करण्यात आला होता. याचाच परिपाक म्हणजे आज विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे दैदिप्यमान यश आहे, असे मत संस्थेचे अध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांनी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष एकनाथराव ढाकणे, सचिव श्रीमती जया राहाणे, समन्वयक प्रा.ऋषिकेश ढाकणे, प्राचार्य तथा प्रशासकीय अधिकारी डॉ. आर. एच अत्तार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष