विधायक कामांवर भर देत स्नेहबंधचे काम : आमदार जगताप

By : Polticalface Team ,Fri Mar 18 2022 14:39:25 GMT+0530 (India Standard Time)

विधायक कामांवर भर देत स्नेहबंधचे काम : आमदार जगताप अहमदनगर (प्रतिनिधी) - समाजात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांना मदतीचा हात आपण दिला तर त्यांचे आयुष्य सुकर होऊ शकते. नवीन पिढीला सोबत घेऊन विधायक कामांवर भर दिला, तर समाजातील अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. या विचारातून स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे हे कार्यरत आहेत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्यातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाज पुरस्कार २०२२ प्रदान पुणे येथे स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे यांना मिळाला. त्यानिमित्त आमदार जगताप यांनी शिंदे यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, अभिनेते मोहिनीराज गटणे, अभिजीत ढाकणे, गणेश बोरुडे, तुषार मेघळे आदी उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, समाजात शिंदे यांच्यासारखे चांगले लोक आहेत. किमान एकाला तरी मदत करावी हा चांगला विचार घेऊन स्नेहबंध फाउंडेशन काम करत आहे. नवीन पिढीला सोबत घेऊन विधायक कामांवर भर दिला, तर समाजातील अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात, हे शिंदे यांनी त्यांच्या सामाजिक कार्यातून दाखवून दिले आहे. प्रा. विधाते म्हणाले, छोट्या कुटुंबपद्धती आणि आपल्यापुरतेच पाहणाऱ्या काळात सामाजिक कार्य उभारणे आणि दुसऱ्याची सेवा करणे कठीण काम असते. शिंदे यांच्यासारखे मोजकेच लोक इतरांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतात. प्रत्येक जण स्वतःसाठी जगत आहेत. या जगण्याला अर्थ नाही. त्यामुळे प्रत्येकांनी समाजाचे काहीतरी देणे लागतो, असे समजून कार्य केले पाहिजे. *पुरस्कारामुळे मिळाली ऊर्जा* पुरस्कारामुळे मला ऊर्जा मिळाली. सामाजिक काम करताना प्रचंड अडचणी येतात. स्नेहबंध चे काम कोणतीही मदत न घेता हे काम सुरू आहे. समाजातील अनेक नागरिक आम्हाला मदत करतात. त्यामुळे अनेक प्रश्न सुटत आहेत, असे स्नेहबंध चे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी