मनोरंजनात्मक खेळातून आरोग्य विकास कार्यशाळा संपन्न
By : Polticalface Team ,Fri Mar 18 2022 14:51:24 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
दादा पाटील राजळे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ, दादापाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आदिनाथनगर तसेच शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच मनोरंजनात्मक खेळातून आरोग्य विकास कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.अण्णासाहेब कृषी तंत्र निकेतन चे प्राचार्य. डॉ. युवराज सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी त्यांनी आरोग्यासाठी खेळाला किती महत्त्व आहे, हे विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच निरोगी आयुष्य जगण्यासाठी एक तरी खेळ आपण खेळायला पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दादापाटील राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर ज.टेमकर होते .त्यांनी कार्यशाळेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळात सहभाग घेणे, आज काळाची गरज आहे, असे यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले. याच बरोबर मंचावर आय. क्यु. ए. सी. समन्वयक प्रा. राजू घोलप, क्रीडा समिती अध्यक्ष डॉ. ज्ञानदेव कांडेकर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. देविदास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना विविध गटांमध्ये विभागणी करून डॉजबॉल, ग्रुप गेम, चेन रन, ह्यूमन नॉट, सेव द बलून असे विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले व त्यातून विद्यार्थ्यांचा आरोग्य विकास कशाप्रकारे साधता येतो, हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. शारीरिक शिक्षण संचालक प्रा. रोहित आदलिंग यांनी कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम पाहिले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. अतुलकुमार चौरपगार यांनी केले तर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. किशोरकुमार गायकवाड, प्रा. आसाराम देसाई, प्रा. चंद्रकांत पानसरे, प्रा. योगिता इंगळे व क्रीडा विभागातील सर्व खेळाडू यांचे सहकार्य लाभले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी